चेन्नई सुपरकिंग्जचा अनुभवी ऑलराउंडर रविचंद्रन अश्विन संघाने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने फ्रँचायझीलाही कळवल्याचे समजत आहे. त्याने अचानक असा निर्णय का घेतला? हे अद्याप समजू शकले नाही. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात फ्रँचायझीने त्याला ९.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
अश्विनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जकडून केली. अश्विन २०१० पासून ते २०१५ पर्यंत सीएसकेचा भाग होता. त्यानंतर २०१६ ते २०१४ दरम्यान, तो दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स सारख्या वेगवेगळ्या संघांकडून खेळला. ९ वर्षांनंतर तो पुन्हा सीएसकेकडून खेळताना दिसला. अश्विन केवळ सीएसके सोडणार नाही तर तो सीएसके अकादमीच्या संचालकपदाचा राजीनामाही देणार आहे. त्याला गेल्या वर्षीच ही जबाबदारी मिळाली होती. याबाबत क्रिकबझने वृत्त दिले आहे.
आयपीएल २०२५ खराब कामगिरीआयपीएल २०२५ चा हंगाम अश्विनसह सीएसकेसाठी चांगला ठरला नाही. अश्विनने या हंगामात एकूण ९ सामने खेळले, ज्यामध्ये तो फक्त ७ विकेट्स घेऊ शकला. शिवाय, तो फलंदाजीतही काही खास कामगिरी करू शकला नाही. आयपीएलमध्ये आर अश्विन सीएसकेसह एकूण पाच संघाकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या एकूण २२१ सामन्यात ७.२० इकोनॉमीने १८७ विकेट्स घेतल्या आहेत आणि ८३३ धावा केल्या आहेत, ज्यात एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे.