Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Purple Cap Race : आघाडीच्या पाचमध्ये सगळे भारतीय! CSK च्या पठ्ठ्याचा पहिला नंबर

प्रसिद्ध कृष्णा मागे पडला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:33 IST

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आघाडीच्या पाचमध्ये सर्वच्या सर्व भारतीय चेहरे आहेत. कमालीची गोष्ट ही की, गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील गोलंदाज पर्पल कॅपच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर दिसतो. 

अंशुल कंबोज अव्वल

चेन्नई सुपर किंग्सकडून अंशुल कंबोज याने ६ सामन्यात १३० चेंडूत १६.२३ च्या सरासरीसह २११ धावा खर्च करताना १३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. एकदाही फोर विकेट्स किंवा फाइव्ह विकेट्सचा डाव न साधता तो अव्वल स्थानावर पोहचला आहे.  

IPL 2026 Orange Cap Race : 'या' परदेशी बॅटरनं कोहली-गिलला टाकले मागे; वैभव सूर्यवंशीचं काय?

प्रसिद्ध कृष्णा मागे पडला, पण...

या यादीत लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय गोलंदाज प्रिन्स यादव दुसऱ्या स्थानावर आहे. ६ सामन्यात त्याने ११ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णा ५ सामन्याील ११ विकेट्स घेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने अंशुल आणि प्रिन्स यादव यांच्यापेक्षा एक सामना कमी खेळला आहे. याशिवाय एकदा त्याने ४ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात तो दमदार कमबॅक करून अव्वलस्थानी झेप घेऊ शकतो. 

भुवीसह रवी बिश्नोईची जादू

भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार RCB कडून दमदार कामगिरी करताना दिसते. ६ सामन्यात त्याने १० विकेट्स घेतल्या असून तो या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रवी बिश्नोई ६ सामन्यातील १० विकेट्ससह टॉप ५ मध्ये आहे. त्यानेही एका सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. 

टॉप १० मध्ये फक्तव ३ परदेशी गोलंदाज

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉप १० मध्ये फक्त ३ परदेशी गोलंदाजांचा समावेश आहे.  राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं सलग तीन सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेत सर्वांचे लक्षवेधून घेतले. ६ सामन्यात त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत. तो या यादीत सहाव्या स्थानावर आहे.  याशिवाय क्रुणाल पांड्या, कार्तिक त्यागी, जेमी ओव्हरटन आणि एशान मलिंगा यांनी प्रत्येकी ८-८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Purple Cap: Indian Bowlers Dominate, CSK's Kamboj Leads

Web Summary : Indian bowlers lead the IPL 2026 Purple Cap race, with CSK's Anshul Kamboj topping the list. Prince Yadav is second, followed by Prasidh Krishna. Bhuvneshwar Kumar and Ravi Bishnoi round out the top five. Only three foreign bowlers feature in the top ten.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स