श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!

Punjab Kings Beats Chennai Super Kings: आयपीएलमध्ये आज खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स राखून पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 23:55 IST2026-04-03T23:52:54+5:302026-04-03T23:55:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Punjab Kings won by 5 wkts agaist Chennai Super Kings, Shreyas Iyer Key Role | श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!

श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!

आयपीएलमध्ये आज खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सनेचेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स राखून पराभूत केले. कर्णधार श्रेयस अय्यरच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईचे २०९ धावांचे डोंगरासारखे आव्हान केवळ १८.४ षटकांत पार केले. या विजयासह पंजाबच्या संघाने या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळव आहे. तर, चेन्नईच्या संघाला सलग दोन वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागले.

नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर संजू सॅमसन (७ धावा) आणि ऋतुराज गायकवाड (२८ धावा) स्वस्तात परतल्यामुळे संघ अडचणीत सापडला होता. मात्र, त्यानंतर युवा फलंदाज आयुष म्हात्रेने मैदानाचा ताबा घेतला. त्याने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची स्फोटक खेळी करत पंजाबला बॅकफूटवर ढकलले. त्याला शिवम दुबेची मोलाची साथ मिळाली.

दुबेने २७ चेंडूंमध्ये नाबाद ४५ धावा कुटल्या. तर, अखेरच्या षटकांत सरफराज खानने केवळ १२ चेंडूंमध्ये ३२ धावांची आक्रमक फलंदाजी केली. या योगदानामुळे चेन्नईने २० षटकांत ५ बाद २०९ धावांचा डोंगर उभा केला. पंजाबकडून विजय कुमार वैशाखने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, मार्को जान्सेन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

पंजाबचा दणदणीत विजय

दरम्यान, २१० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. प्रियांशने केवळ ११ चेंडूंमध्ये ४ षटकार आणि ३ चौकारांसह ३९ धावा कुटून चेन्नईच्या गोलंदाजांवर दडपण आणले. प्रभसिमरन सिंगनेही ४३ धावांचे योगदान दिले, मात्र तो धावबाद झाला. मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यरने आघाडीवरून नेतृत्व करत २९ चेंडूंमध्ये ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले. पंजाबने हे लक्ष्य १८.४ षटकांत ५ विकेट्स गमावून विजय मिळवला.

Web Title : श्रेयस अय्यर का अर्धशतक, पंजाब ने चेन्नई को हराया

Web Summary : श्रेयस अय्यर के शानदार अर्धशतक से पंजाब किंग्स ने आईपीएल में चेन्नई सुपर किंग्स को 5 विकेट से हराया। पंजाब ने 209 रनों का विशाल लक्ष्य 18.4 ओवरों में हासिल कर लगातार दूसरी जीत दर्ज की। चेन्नई को लगातार दूसरी हार का सामना करना पड़ा।

Web Title : Shreyas Iyer's Fifty Leads Punjab to Victory Over Chennai

Web Summary : Shreyas Iyer's blistering half-century powered Punjab Kings to a 5-wicket victory over Chennai Super Kings in the IPL. Punjab chased down a daunting 209-run target in just 18.4 overs, securing their second consecutive win. Chennai faced their second straight defeat.