IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans : आयपीएलच्या २०२६ च्या हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलसहजोस बटलर चांगली सुरुवात मिळाल्यावर अर्धशतका आधीच अडखळल्याचे पाहायला मिळाले. या दोघांशिवाय पंजाबच्या गोलंदाजीसमोर अन्य कोणत्याही बॅटरचा निभाव लागला नाही. परिणामी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६२ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गिल-बटलर जोडी चहलच्या जाळ्यात फसली
पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर महाराजा यादविंद्रसिंग स्टेडियमवर श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार शुभमन गिलनं युवा बॅटर साई सुदर्शनच्या साथीनं गुजरात टायटन्सच्या डावाची सुरुवात केली. साई सुदर्शन स्वस्तात आटोपल्यावर कर्णधार शुबमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. तो सेट झाल्याचे दिसत असताना युजवेंद्र चहलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला गिलनं या सामन्यात २७ चेंडूचा सामना करून ४ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. तो माघारी फिरल्यावर बटलरने खास खेळीची आस होती. पण चहलनं त्याच्याही खेळीला ब्रेक लावला. तो ३३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावांवर माघारी फिरला. पंजाबच्या संघाकडून चहलशिवाय विजयकुमार वैशाक याने सर्वाधिक ३ विकेट्स घेत हवा केली.
IPL 2026: कोण आहे Ashok Sharma? नेहरानं हेरलेला ‘मोहरा’; ताशी १५० kmph वेगाने करतो भेदक मारा
विजयकुमार वैशाकसमोर बिग हिटर ठरले फिके
विजयकुमार वैशाक याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात गेन फिल्पस २५ (१७), वॉशिंग्टन सुंदर १८ (१६) आणि शाहरुख खानला अवघ्या ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्याशिवाय मार्को यान्सेन याने साई सुदर्शनच्या रुपात संघाला पहिली विकेट मिळवून दिली. साईनं ११ चेंडूचा सामना करून फक्त १३ धावांचे योगदान दिले.
फक्त तीन षटकार अन् अर्धशतकाशिवाय संपला डाव
गुजरात टायटन्सचा संघ IPL स्पर्धेत षटकारांची सरासरी सर्वात कमी असणारा संघ आहे. हे चित्र या सामन्यातही पाहायला मिळाले. जोस बटलरच्या बॅटमधून निघालेल्या दोन षटकारांशिवाय ग्लेन फिलिप्सन मारले एक षटकारासह संघाकडून फक्त तीन षटकार पाहायला मिळाले. त्यात एकाही खेळाडूला अर्धशतकी डाव साधता न आल्यामुळे गुजरातच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. यंदाच्या हंगामात GT नं डावातील षटकारांची संख्या वाढवली नाही तर त्यांचा स्पर्धेत निभाव लागणं मुश्किल होऊ शकते.