IPL 2026 च्या हंगामाआधी माजी कॅरिबियन स्टार आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर (मार्गदर्शन) ड्वेन ब्रावो वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. केकेआरच्या पत्रकार परिषदेत त्याने जे वक्तव्य केले ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणेनं त्याला माईक सुरु असल्याचे सांगत त्याला रखलं. पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं? ब्रावो असं काय बोलला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KKR च्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ क्लिप व्हायरल
कोलकाता नाईट रायडर्सच्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक अभिषक नायर, सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन आणि कर्णधार अजिंक्य रहाणेसह ड्वेन ब्रावो उपस्थित होता. सोशल मीडियावर जी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यात सर्वजण एकमेकांना अभिवादन करताना दिसते. यावेळी ब्रावोनं सहकारी स्टाफसोबत चर्चा करताना केलेली कमेंट वादग्रस्त ठरत आहे.
IPL 2026 : लग्न की, विघ्न..! RCB च्या ताफ्यातून 'हा' गोलंदाज 'गायब' होण्यामागचं कारण काय?
नेमकं काय म्हणाला ब्रावो?
जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात ब्रावो म्हणतो की, "जेव्हा या लोकांनी मला बोलावलं, तेव्हा माझ्या घरी दोन ‘चिक्स’ (तरुणी'/गर्लफ्रेंड) होत्या." या कमेंटनंतर त्याच्या शेजारी बसलेला KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणे याने माईक सुरु असल्याचे सांगत त्याला सावध केले. मगर ब्रावोच्या चेहऱ्यावरील हाव-भाव बदलल्याचे दिसून आले. Oh Shit असे म्हणत आपण चुकल्याची खंतही तो व्यक्त करताना दिसून येते. पत्रकार परिषदेला बोलवण्यासाठी कॉल आला त्यावेळी दोघींसोबत होतो ही गोष्ट त्याने सहकारी स्टाफसोबत शेअर केली. माईक सुरु असल्याची कल्पनाच त्याला नव्हती. जर अजिंक्य रहाणेनं त्याला रोखलं नसतं तर तो आणखी काय बोलला असता? अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे।
'त्या' दोघी कोण? हे गुलदस्त्यात पण...
त्या दोन तरुणी नेमक्या कोण होत्या? कदाचित त्या त्याच्या मैत्रिणीही असू शकतात. एका कमेंटच्या आधारावर ठाम निष्कर्ष काढणे योग्य नाही. पण आपण पत्रकार परिषदेत असताना काय बोलतोय याचं भान जपलं पाहिजे. खेळाडू, मेंटॉरच्या रुपात व्यक्ती संघ आणि स्पर्धेचेही प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अशा प्रसंगी जबाबदारीने व्यक्त व्हायरला पाहिजे. ब्रावोनं याचं भान राखलं नाही. त्याची कमेंट महिलांचा अपमान करणारी आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
याआधी हार्दिक पांड्यानं मागितली होती माफी
क्रिकेटर्स आणि त्यांची वादग्रस्त व्यक्तव्ये हे काही नवे नाही. भारतीचा अष्टपैलू स्टार हार्दिक पांड्या अशाच एका वक्तव्यामुळे वादात सापडला होता. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये त्याने केलेले वक्तव्य महिलांचा अपमान करणारे होते, अशी चर्चा रंगली. यावर हार्दिक पांड्याने माफीही मागतली होती.