IPL 2026 PBKS vs SRH Abhishek Sharma Fifty SRH 3rd Highest Powerplay Score : सनरायझर्स हैदराबाद सलामीवीर अभिषेक शर्मा याने न्यू चंडीगडच्या मैदानात रंगलेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कडक फलंदाजी केली. अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक साजरे करत त्याने पंजाबी गोलंदाजांचे खांदे पाडले. दुसऱ्या बाजूला त्याला ट्रॅविस हेडनं उत्तम साथ दिली. या दोघांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदरबादच्या संघाने पॉवर प्लेमध्ये शतक साजरे करत आयपीएलच्या इतिहासातील पॉवर प्लेमधील तिसरी सर्वाच्च धावसंख्या उभारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक-हेडचा कहर, SRH नं उभारली विक्रमी धावसंख्या
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड जोडीनं फक्त ४९ चेंडूत १२० धावांची धमाकेदार भागीदारी रचली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता १०५ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील पॉवर प्लेमधील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २०२४ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्या ६ षटकात १२५ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. याच हंगामात लखनौ सुपर जाएंट्सविरुद्ध त्यांनी १०७ धावा केल्या होत्या.
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
अभिषेक शर्माचं शतक तर ट्रॅवि हेड अर्धशतक हुकलं
अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्मा शतक झळकावेल, असे वाटत होते. पण २८ चेंडूत ७४ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला. शशांक सिंगने विकेट घेण्याआधी अभिषेकनं आपल्या वादळी खेळीत ५ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याआधी ट्रॅविस हेड २३ चेंडूत ३८ धावांवर बाद झाला. त्याची विकेटही शशांकनेच घेतली.
Web Summary : Abhishek Sharma's blistering 50 and Travis Head's support powered SRH to a century in the powerplay against PBKS. SRH recorded the third-highest powerplay score in IPL history.
Web Summary : अभिषेक शर्मा के तूफानी अर्धशतक और ट्रैविस हेड के सहयोग से SRH ने पंजाब के खिलाफ पावरप्ले में शतक बनाया। SRH ने आईपीएल इतिहास में तीसरा सबसे बड़ा पावरप्ले स्कोर बनाया।