IPL पदार्पणाच्या सामन्यात कूपर कॉनॉली (Cooper Connolly) चे दमदार अर्धशतक आणि अखेरच्या षटकात ट्विस्ट निर्माण झाल्यावर झेवियर बार्टलेट (Xavier Bartlett) याने त्याला दिलेली साथ याच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध विजयी सलामी दिली . गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६२ धावा करत पंजाबच्या संघासमोर १६३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने दमदार सुरुवात केली. पण प्रसिद्ध कृष्णाने सामन्यात ट्विस्ट आणले. मोक्याच्या क्षणी पंजाबच्या संघाने ८ धावांत ४ विकेट्स गमावल्या अन् सामना गुजरात टायटन्सच्या बाजूनं फिरतोय, असे चित्र निर्माण झाले. पण कूपर कॉनॉली एका बाजूनं मैदानात तग धरून थांबला. खणखणीत चौकार मारत त्यानेचा विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
८ धावांत ४ विकेट्स; प्रसिद्ध कृष्णानं मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
गुजरात टायटन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवात खराब झाली. कगिसो रबाडाने प्रियांश आर्यला अवघ्या ७ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अवघ्या ७ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन कूपर कॉनॉली मैदानात उतरला. प्रभसिमरनच्या साथीनं त्याने दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर सामना पंजाबच्या बाजूनं झुकला. पण ११० धावांवर प्रसिद्ध कृष्णानं श्रेयस अय्यरची विकेट घेतली अन् सामन्यात ट्विस्ट आले. लेट एन्ट्री मारलेल्या प्रसिद्ध कृष्णानं आपल्या पुढच्या षटकात शशांक सिंग आणि मार्कस स्टॉयनिसला स्वस्तात माघारी धाडले. नेहल वढेरा वॉशिंग्टनच्या जाळ्यात सापडला. ८ धावांत ४ विकेट्स गमावल्यामुळे १५ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पंजाबची अवस्था ६ बाद ११८ अशी झाली.
IPL 2026: कोण आहे Ashok Sharma? नेहरानं हेरलेला ‘मोहरा’; ताशी १५० kmph वेगाने करतो भेदक मारा
संघ अडचणीत असताना दोन ऑस्ट्रेलियन पंजाबच्या मदतीला धावले
अखेरच्या षटकात सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. धावफलकावर १४४ धावा असताना पंजाबच्या संघाने मार्को यान्सेनच्या रुपात सातवी विकेट गमावली. कूपर कॉनोली याला साथ देण्यासाठी झेवियर बार्टलेट मैदानात आला. २ षटकांत १६ धावांची गरज असताना त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत संघाला मोठा दिलासा दिला. कूपर कॉलॉनी याने खणखणीत चौकार मारत पंजाबच्या संघाला मॅच जिंकून दिली. कूपर कॉलॉनी याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीशिवाय झेवियर बार्टलेट याने ५ चेंडूत केलेली ११ धावांची खेळीही महत्त्वपूर्ण ठरली.