Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : अर्शदीप सिंगची ओव्हर संपता संपेना! लाजिरवाण्या विक्रमासह पांड्या अन् सिराजच्या पंक्तीत

४२ धावा खर्च करून विकेटलेस राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 22:55 IST

Open in App

टी-२० क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्या नावे आयपीएलमध्ये लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. पंजाब किंग्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याचे षटक संपता संपेना, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी न्यू चंदीगडमधील मुल्लानपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात त्याने ११ चेंडूंचे षटक टाकले. यासह सर्वात मोठे षटक टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावे झाला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या यादीत हार्दिक पांड्यासह मोहम्मद सिराजचंही नाव

गुजरात टायटन्सच्या डावातील २०व्या षटकात टाकलेल्या या षटकात त्याने चार वाईड्स आणि एक नो-बॉल टाकला. या षटकात त्याने १२ धावा खर्च केल्या. यापूर्वी हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर आणि संदीप शर्मासह तुषार देशपांडे आणि मोहम्मद सिराज या स्टार गोलंदाजांनी आयपीएलमध्ये ११ चेंडूंचे षटक टाकल्याचे पाहायला मिळाले होते. या यादीत आता अर्शदीपचाही समावेश झाला आहे. 

IPL 2026: कोण आहे Ashok Sharma? नेहरानं हेरलेला ‘मोहरा’; ताशी १५० kmph वेगाने करतो भेदक मारा

४२ धावा खर्च करून विकेटलेस राहिला

अर्शदीप सिंग हा पॉवरप्लेमध्ये विकेट घेणारा किंग म्हणून ओळखला जातो. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तो आपली छाप सोडू शकला नाही. आपल्या ४ षटकांच्या कोट्यात त्याने एकही विकेट न घेता ४२ धावा खर्च केल्या. या सामन्यात पंजाब किंग्सने चहल आणि विजयकुमार वैशाकच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सला २० षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६२ धावांवर रोखले. विजयकुमार वैशाकनं ३४ धावा खर्च करत सर्वाधिक ३ तर चहलन २८ धावांत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

आयपीएल इतिहासातील सर्वात लांब षटके (चेंडूंच्या संख्येनुसार)

  • अर्शदीप सिंग - पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (२०२६)
  • हार्दिक पांड्या - मुंबई इंडियन्स विरुद्ध  गुजरात टायटन्स (२०२५)
  • शार्दुल ठाकूर - लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  (२०२५)
  • संदीप शर्मा - राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स  (२०२५)
  • तुषार देशपांडे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स (२०२३)
  • मोहम्मद सिराज - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०२३)
English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Arshdeep Singh's costly over joins unwanted record list.

Web Summary : Arshdeep Singh bowled an expensive 11-ball over in IPL 2026, joining Hardik Pandya and Mohammed Siraj in an unwanted record. He conceded 42 runs without taking a wicket. Punjab Kings restricted Gujarat Titans to 162, with Chahal and Vijaykumar Vaisha contributing.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सगुजरात टायटन्सअर्शदीप सिंगइंडियन प्रीमिअर लीग