Arshdeep Singh Spark Dating Rumours Samreen Kaur : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज सध्या IPL मधील प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्सच्या संघातून खेळताना दिसत आहे. टी-२० क्रिकेटमधील पॉवर प्लेमध्ये 'किंग इज सिंग शो' दाखवण्यात माहिर असलेला हा गोलंदाज फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत आला आहे. अर्शदीप सिंग याने स्नॅपचॅट हँडलवरुन एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यात तो एका तरुणीचा हात हातात घेऊन बसल्याचे दिसते. हा फोटो व्हायरल झाल्यावर अर्शदीप सिंगच्या आयुष्यात आलेली सुंदरी कोण? याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. क्रिकेटरनं तिचा चेहरा लपवला असला तरी त्याने शेअर केलेल्या फोटोत दिसणाऱ्या तरुणीच्या हातावरील टॅटू पाहून ती मिस्ट्री गर्ल कोण? तिचं नाव काय? हे नेटकऱ्यांनी शोधून काढल्याचे दिसत आहे..
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्शदीप या अभिनेत्रीशी करतोय डेट? सोशल मीडियावर रंगली चर्चा
अर्शदीप सिंगने शेअर केलेल्या फोटोत तरुणीच्या हातावरी टॅटू हा मिस्ट्री गर्लची ओळख उघड करणारा ठरतो आहे. क्रिकेटर मॉडेल आणि अभिनेत्री समरीन कौर हिच्यासोबत डेट करत असल्याचे बोलले जात आहे. जम्मू-काश्मीरची समरीन ही २०१८ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्देतील फायनलिस्ट राहिली आहे. ती पंजाबी आणि हिंदी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक गाण्यात तिची अदाकरी पाहायला मिळाली आहे.
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
तिच्या हातावरील टॅटू अन्...
अर्शदीप सिंगने जो फोटो शेअर केला आहे त्यात तरुणीच्या हातावर एक टॅटू दिसतो. या टॅटूवरून ही तरुणी समरीन कौर असल्याचा दावा करण्यात येत आहे. समरीनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या बाजूला टॅटूची जी डिझाईन दिसून येते तीच डिझाईन अर्शदीप सिंगनं शेअर केलेल्या फोटोतही दिसते. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगचा खेळ रंगल्याची हिंट मिळत आहे. दोघांनीही अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही.