IPL 2026 Orange Cap List Of Batters With The Most Runs : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या तीन आठवड्यातील कामगिरी पाहता सर्वाधिक धावा कऱणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीयांचा बोलबाला कायम आहे. पण टॉप ५ मध्ये असलेल्या एकमेव परदेशी बॅटरनं एकाच डावात टीम इंडियाचा किंग विराट कोहली आणि प्रिन्स शुभमन गिलला मागे टाकत काव्या मारनच्या ऑरेंज आर्मीतील हेन्री क्लासेन याने ऑरेंज कॅप पटकावली आहे. सनरायझर्स विरुद्ध झिरो ठरलेल्या वैभव सूर्यवंशीनं दमदार खेळीसह टॉप ५ मध्ये एन्ट्री मारल्याचे दिसते. इथं एक नजर टाकुयात तीन आठवड्यांच्या कामगिरीनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यीत आघाडीच्या पाच बॅटर्सच्या यादीत कोण कितव्या स्थानी आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
हेन्री क्लासेन
सनरायझर्सचा लोअर मिडल ऑर्डरमधील बॅटर हेन्री क्लासेन याने ६ सामन्यातील ६ डावात ४७.१७ च्या सरासरीसह १४४.३९ स्ट्राईक रेटनं १९ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २८३ धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके आली आहेत.
गिल मागे पडला असला तरी भारी...
शुभमन गिल हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण ४ सामन्यातील ४ डावात ३ अर्धशतकासह त्याने ६२.७५ च्या सरासरीसह १५४.९४ च्या स्ट्राईक रेटसह २५१ धावा केल्या आहेत. सरासरीसह स्ट्राईक रेटच्या बाबतीत तो क्लासेनच्या एक पाऊल पुढे आहे. एवढेच नाही तर त्याच्यापेक्षा कमी सामने खेळून गिलच्या खात्यात १० षटकार आणि २४ चौकार पाहायला मिळाले आहेत.
विराट कोहलीही टॉप ३ मध्ये आहे. RCB च्या स्टार बॅटरनं ६ सामन्यातील ६ डावात ४९.४० च्या सरासरीसह १५७.३२ च्या स्ट्राईक रेटनं २८ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने २४७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत.
राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक बॅटर आणि वंडर बॉय वैभव सूर्यवंशी याने दोन अर्धशतकासह ६ सामन्यातील ६ ड़ावात २४६ धावा केल्या आहेत. ४१ च्या सरासरीनं धावा काढणारा वैभव सर्वोच्च स्ट्राईक रेटच्या (२३२.५४) बाबतीत प्रियांश आर्य पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.
रजत पाटीदारचाही धमाका
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने यंदाच्या हंगामात धुरंधूर लूकप्रमाणेचे धमाकेदार खेळीसह आपली खास छाप सोडली आहे. ४६ च्या सरासरीसह २१२.९६ च्या स्ट्राईक रेटनं त्याने ६ सामन्यातील ६ डावात २ अर्धशतकाच्या मदतीने २३० धावा केल्या आहेत.
Web Summary : Henry Klassen tops IPL 2026 Orange Cap race, surpassing Kohli and Gill. Suryavanshi shines. Klassen leads with 283 runs, followed by Gill (251), Kohli (247), Suryavanshi (246), and Patidar (230).
Web Summary : हेनरी क्लासेन ने आईपीएल 2026 ऑरेंज कैप की दौड़ में कोहली और गिल को पछाड़ दिया। सूर्यवंशी चमके। क्लासेन 283 रनों के साथ सबसे आगे, उसके बाद गिल (251), कोहली (247), सूर्यवंशी (246), और पाटीदार (230) हैं।