IPL 2026 New Guidelines Match Day Practice Ban : आयपीएल २०२६ च्या नव्या हंगामातील स्पर्धेसाठी सर्व १० फ्रँचायझी संघ तयार आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही खास नियम आणि मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. संपूर्ण स्पर्धेत फ्रँचायझी संघ आणि खेळाडूंना हे नियम पाळावे लागणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL स्पर्धेआधी BCCI ची नवी नियमावली
क्रिकबजच्या अहवालानुसार, IPL संदर्भात लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार, सामन्याच्या दिवशी कोणत्याही संघाला सराव करण्याची परवाना दिली जाणार नाही. खेळपट्टीची खबरदारी म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये BCCI ने प्रत्येक संघाला सरावासाठी दोन नेट्स आणि मुख्य स्क्वेअरवर रेंज-हिटिंगसाठी एक साइड विकेट देणार आहे. जर दोन्ही संघ एकाच वेळी सराव करत असतील तर दोन्ही संघांना स्वतंत्र दोन खेळपट्टी दिल्या जातील. प्रतिस्पर्धी संघासाठी राखीव असणारी खेळपट्टी रिकामी असली तरी इथं सराव करता येणार नाही.
फिटेनस टेस्ट अन् फॅमिलीसंदर्भातील नियम
सामन्याच्या दिवशी खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेण्यासही परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय खेळाडूंच्या कुटुंबीयांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. IPL दरम्यान खेळाडूंच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीबाबतही बोर्डाने काही नियम जाहीर केले आहेत. मैदानावर जाण्यासाठी फक्त टीम बसचाच वापर करणे बंधनकारक असेल. तसेच ट्रेनिंग सेशनदरम्यान कुटुंबीय आणि मित्रांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. ते फक्त ठरवलेल्या हॉस्पिटॅलिटी एरियातूनच सराव पाहू शकतील.
ड्रेस कोड नियम
- सुरुवातीच्या षटकांमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप घालणे आवश्यक असेल.
- पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनवेळी स्लीवलेस जर्सी किंवा फ्लॉपी घालण्यास मनाई असेल.
- सामन्याच्या दिवशी डॉक्टरसह फक्त १२ सपोर्ट स्टाफ सदस्यांना टीमसोबत राहण्याची परवानगी
- खेळाडूंच्या जर्सी नंबरमध्ये बदल करायचा असल्यास किमान २४ तास आधी माहिती देणे आवश्यक
या सर्व नव्या नियमांचा उद्देश सामन्यादरम्यान शिस्त राखणे आणि सर्व टीम्ससाठी समान परिस्थिती निर्माण करणे हा