Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!

 KKR खरंच कॅमरून ग्रीनसाठी एवढी मोठी बोलू लावू शकतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:08 IST

Open in App

आयपीएल २०२६ साठी होणाऱ्या मिनी लिलावात कुणाला सर्वाधिक भाव मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. मिनी लिलावाआधी स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टरच्या पॅनमधील माजी दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत कोणत्या खेळाडूर किती बोली लागेल, यासंदर्भात मॉक ऑक्शन ड्रील झाली. ज्यात कॅमरुन ग्रीनवर विक्रमी ३०.५० कोटी एवढी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मॉक ऑक्शनमध्ये CSK ची थट्टा? KKR नं मारली फायनल बाजी! 

मॉक ऑक्शनमध्ये या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पर्समध्ये मोठी रक्कम असलेल्या KKR आणि CSK यांच्यात चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले.  CSK चं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुरेश रैनानं या खेळाडूसाठी ३० कोटींपर्यंत रक्कम मोजण्याची तयारी दाखवली. पण शेवटी KKR चं प्रतिनिधीत्व करणाऱ्या रॉबिन उथप्पाने ५० लाख अधिक मोजत ३०.५० कोटींसह या अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. खरतंर ही CSK ची थट्टा केल्यासारखेच होते. यंदाच्या लिलावासाठी KKR पाठोपाठ (६४.३० कोटी) CSK च्या पर्समध्ये सर्वाधिक ४३.४० कोटी एवढी रक्कम आहे. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा चॅम्पियन ठरलेला संघाचा एक असाही इतिहास आहे की, ते लिलावात एखाद्या खेळाडूवर कधीच मोठी बोली लावत नाहीत. त्यामुळेच यंदाच्या लिलावात असे चित्र दिसेल याची शक्यता कमी आहे. 

IPL 2026 Auction : परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागली तर BCCI होणार मालामाल! ते कसं? जाणून घ्या सविस्तर

आतापर्यंतच्या इतिहासात लिलावात CSK नं सर्वाधिक पैसा मोजलेला खेळाडू कोणता?

CSK च्या संघाने २००८ ते २०२५ या कालावधीत झालेल्या IPL लिलावात मोजक्या खेळाडूंवर मोठी रक्कम मोजली आहे. २०२३ च्या लिलावात CSK च्या संघाने इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स याच्यासाठी १६.२५ कोटी इतकी रक्कम मोजली होती. स्टोक्स हा CSK चा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील लिलावातील सर्वात महागडा खेळाडू आहे. या यादीत दीपक चाहर आणि डॅरेल मिचेल यांचाही समावेश आहे. या दोघांसाठी अनुक्रमे २०२२ आणि २०२४ च्या लिलावात CSK नं १४ कोटींपर्यंत बोली लावली होती.

 KKR खरंच कॅमरून ग्रीनसाठी एवढी मोठी बोलू लावू शकतो का?

मॉक ऑक्समध्ये जे चित्र दिसलं ते मिनी लिलावात खरंच दिसेल का? शाहरुख खानच्या मालकीचा संघ कॅमरून ग्रीनसाठी मोठी रक्कम मोजू शकतो का? याचं अचूक अंदाज लावणं कठीण आहे. पण KKR च्या पर्समधली तगडी रक्कम आणि लिलावात खेळाडूंवर पैसा ओतण्याचा त्यांचा छंद पाहता ते शक्य होऊ शकते. मेगा लिलावात KKR च्या संघाने व्यंकटेश अय्यरसाठी २३.७५ कोटी मोजून सर्वांनाच थक्क करून सोडले होते. त्याला नारळ दिल्यावर त्याच्या बदली कॅमरून ग्रीनसारख्या खेळाडूवर मोठी बोली लावणं केकेआरसाठी सहज शक्य आहे.

IPL मधील कॅमरुन ग्रीनची कामगिरी

  • IPL २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून १६ सामन्यात ४५२ धावा (१७.५० कोटी)
  • IPL २०२४ च्या हंगामात RCB कडून १३ सामन्यात २५५ धावा (१७.५० कोटी)
English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Mock Auction: KKR bids record ₹30.5 Cr for Green!

Web Summary : In a mock IPL 2026 auction, KKR acquired Cameron Green for ₹30.5 crore, surpassing CSK's interest. This mock drill suggests KKR might spend big, contrasting CSK's historical auction strategy. Green's IPL performance and KKR's past spending habits indicate a potential for high bids.
टॅग्स :आयपीएल लिलाव 2026आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सकॅमरून ग्रीन