मुंबईतील वानखेडेच्या घरच्या मैदानातून मुंबई इंडियन्सच्या सघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून यंदाच्या हंगामातील मोहिमेला सुरुवात केली. नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि फिन ॲलन जोडीनं सघाला दमदार सुरुवात करुन देत MI च्या गोलंदाजांचे खांदे पाडले. जिथं जसप्रीत बुमराहसह ट्रेंट बोल्ट विकेट लेस राहिले तिथ शार्दुल ठाकूरनं मैदान गाजवलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लॉर्ड शार्दुल ठाकूरनं दाखवली गोलंदाजीतील धार
पहिल्यांदा फलंदाजीला करताना अजिंक्य रहाणे आणि फिन ॲलन जोडीनं पहिल्या विकेटसाठी ३२ चेंडूत ६९ धावांची भागीदारी रचली. फिन ॲलनच्या रुपात शार्दुल ठाकूर याने पहिली विकेट घेत संघाला मोठा दिलासा दिला. एवढ्यावरच तो थांबला नाही या सामन्यात त्याने कोलकाताचा सर्वात महागडा गडी कॅमरून ग्रीन याला अवघ्या १८ धावांवर माघारी धाडले. याशिवाय अजिंक्य रहाणेच्या खेळीलाही त्यानेच ब्रेक लावला.
MI vs KKR : वानखेडेच्या मैदानात अजिंक्य राहणेचा 'मैं हूं ना' शो! अर्धशतकासह खास विक्रमाला गवसणी
ट्रेडच्या माध्यमातून तो LSG च्या ताफ्यातून MI चा झाला
शार्दुर ठाकूर याने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पदार्पण करताना ४ षटकात ३९ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. २०२१ पासून IPL मध्ये सातत्याने तो वेगवेगळ्या संघाकडून खेळताना पाहायला मिळाले आहे. यंदाच्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून त्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून २ कोटी रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. MI नं दाखवलेला विश्वास या पठ्ठ्यानं पहिल्याच सामन्यात सार्थ ठरवला.
कोलकाताच्या संघाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात केल्या २२० धावा
पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाकडून अजिंक्य रहाणे ६७ (४०) आणि अंगकृष्ण रघुवंशी ५१ (२९) यांच्या अर्धशतकाशिवाय फिन ३७ (१७) आणि रिंकू सिंहच्या २१ चेंडूतील नाबाद ३३ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २२० धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ तर हार्दिक पांड्याने १ विकेट मिळवली. जसप्रीत बुमराह आणि बोल्ट यांना एकही विकेट मिळाली नाही.