Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : प्रसिद्ध कृष्णाचा भेदक मारा; गिल-बटलरचा अर्धशतकी तोरा! LSG च्या घरच्या मैदानात GT चा रुबाब

धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या संघाने ७ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय निश्चित केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 19:18 IST

Open in App

IPL 2026 Gujarat Titans Won By 7 Wkts Against Lucknow Super Giants प्रसिद्ध कृष्णा आणि कगिसो रबाडा यांच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने लखनौचं मैदान मारत यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील १९ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या संघाने ७ विकेट्स आणि ८ चेंडू राखून विजय निश्चित केला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना मिचेल मार्शच्या रुबात अवघ्या १४ धावांवर लखनौ संघाने पहिली विकेट गमावली. कगिसो रबाडाने मार्शला गिलकरवी झेलबााद केले . तो फक्त ११ धावा करून परतला.  कर्णधार रिषभ पंतला मोहम्मद सिराजने अवघ्या १८ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मग पिक्चरमध्ये आला प्रसिद्ध कृष्णा. त्याने सेट झालेल्या एडन मार्करमच्या खेळीला अवघ्या ३० धावांवर ब्रेक लावला. त्याने २१ चेंडूत केलेली ३० धावांची खेळी लखनौच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली. फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे लखनौचा संघि निर्धारित २० षटकात ८ बाद १६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक ४ तर अशोक शर्मानं २ तर कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली. 

लखनौनं दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो १५ धावा करून परतल्यावर कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूत ८४ धावांची मॅच सेट करणारी भागीदारी रचली. शुभमन गिलनं  ४० चेंडूत ५६ धावांची खेळी साकारली. जोस बटलर याने ३७ चेंडूत ६० धावांच्या खेळीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ही दोघेही आपलीय भूमिका बजावून परतल्यार वॉशिंग्टन सुंदर याने १३ चेंडूत २१ तर राहुल तेवतिया याने ८ चेंडूत १० धावांची खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : GT Dominates LSG: Krishna's Bowling, Gill & Buttler's Fifties Win It

Web Summary : Gujarat Titans defeated Lucknow Super Giants by 7 wickets, fueled by Prasidh Krishna and Kagiso Rabada's fierce bowling, and half-centuries from Shubman Gill and Jos Buttler. GT chased down the 164-run target comfortably, securing their second win of the IPL 2026 season.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सगुजरात टायटन्सशुभमन गिलजोस बटलररिषभ पंत