Join us
Daily Top 2Weekly Top 5

GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर

 LSG आणि GT यांच्यातील सामन्यात सारा चर्चेत येण्यामागचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:44 IST

Open in App

IPL 2026 LSG vs GT Sara Tendulkar Is Supporting Arjun Tendulkar Lucknow Super Giants : लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यात सारा तेंडुलकर कोणत्या संघाला सपोर्ट करणार? हा विषय चांगलाच चर्चेचा ठरताना दिसत आहे. सारा तेंडुलकर या लढती आधी लखनौमध्ये पोहचल्यावर तिला दोन्ही संघातील सामन्यात कोणत्या संघाला सपोर्ट करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर सारा तेंडुलकर लाजून गोरीमोरी झाल्याचेही पाहायला मिळाले. पण सामन्यादरम्यान तिची झलक दिसली अन् मॅच आधीच्या चर्चित प्रश्नाच उत्तरही मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

स्टेडियम स्टँडमध्ये साराची झलक दिसली अन्...

   

LSG आणि GT यांच्यातील सामन्या दरम्यान सारा तेंडुलकर स्टेडियमवर उपस्थितीत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबी ड्रेसमध्ये तिने ब्लॅक  सनग्लासेसस लूक परिपूर्ण केल्याचे दिसून येते.  जो फोटो व्हायरल होतोय त्यात ती भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या LSG संघाचीच सपोर्ट असल्याचे चित्रही स्पष्ट झाले. 

LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल

 LSG आणि GT यांच्यातील सामन्यात सारा चर्चेत येण्यामागचं कारण काय?

सारा तेंडुलकर ही लोकप्रिय सेलिब्रेटी किड्सपैकी एक आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत ती मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसली होती. २०२५ च्या हंगामापर्यंत सचिन तेंडुलकरसह अर्जुन तेंडुलकरही या संघाचा भाग होता. पण आता बाप लेकांची टीम बदलली आहे. सचिन तेंडुलकर अजूनही MI च्या डगआउटमध्ये दिसतो. पण साराने मुंबई इंडियन्सची वानखेडेच्या मैदानातील मॅच सोडून भावाच्या संघाला सपोर्ट देताना दिसली. गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकरचे नाव हे शुभमन गिलसोबत जोडले जात आहे. यावर दोघांनीही अधिकृतरित्या कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळेच IPL मधील MI विरुद्ध LSG या बापलेकांच्या लढतीआधी सारा तेंडुलक LSG vs GT यांच्यात कोणत्या संघाला सपोर्ट करणार हा मुद्दा गाजताना दिसत आहे. भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसले तरी तिने जगजाहिररित्या तरी LSG लाच चीअर करण्याला पंसती दिल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Despite Arjun's Absence, Sara Tendulkar Supports LSG in GT Match

Web Summary : Sara Tendulkar was seen supporting Lucknow Super Giants (LSG) against Gujarat Titans (GT), even though her brother Arjun wasn't in the playing eleven. She previously supported Mumbai Indians but now cheers for LSG, fueling speculation amidst rumors linking her to Shubman Gill.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सगुजरात टायटन्ससारा तेंडुलकरअर्जुन तेंडुलकरशुभमन गिल