IPL 2026 LSG vs DC Mohammed Shami vs KL Rahul : टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडत असलेल्या मोहम्मद शमीनं IPL च्या पहिल्याच सामन्यातील पहिल्या चेंडूवर KL राहुलची विकेट घेत लखनौच्या संघाकडून दमदार पदार्पण केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघाने दिल्लीसमोर १४२ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा बचाव करताना टीम इंडियाचा लालानं लोकेश राहुलला खातेही न उघडता तंबूत धाडले. कमालीची गोष्ट ही की, ज्यावेळी KL राहुल LSG च्या संघाचा कर्णधार होता त्यावेळीही गुजरात टायटन्सच्या संघाकडून खेळताना शमीनं त्याला पहिल्या चेंडूवर बाद केल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी दोघे एकाच संघाकडून खेळायचे, फ्रँचायझी बदलल्यावर शमीनं KL राहुलला दमवलं
मोहम्मद शमी हा IPL मध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना पाहायला मिळाले आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली तो पंजाबच्या संघाकडूनही खेळताना दिसला होता. पण ज्या ज्या वेळी तो केएल राहुलच्या विरोधात मैदानात उतरला त्या त्या वेळी टीम इंडियातील दोन धुरंधरांमध्ये मोहम्मद शमी भारी ठरल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद शमी आणि लोकेश राहुल IPL मध्ये ६ वेळा समोरासमोर आले आहेत. शमीनं तीन वेळा त्याची विकेट घेतली आहे तर लोकेश राहुलनं त्याच्यासमोर फक्त ४३ धावा काढल्या आहेत.
LSG सेनापती कमनशिबी ठरला! मग DC च्या गोलंदाजांसमोर सगळ्यांनीच तलवार केली म्यान
शमीचा 'पंजा'; असा पराक्रम अन्य कुणाला नाही जमला
लोकेश राहुलला पहिल्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवताना मोहम्मद शमीनं विक्रमी 'पंजा' मारला. IPL मध्ये पहिल्या चेंडूवर पाचव्यांदा त्याने विकेट घेतली. या यादीत त्याच्यापाठोपाठ प्रविण कुमार, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा आणि पॅट कमिन्स यांनी ३ वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्याचा रेकॉर्ड आहे.