Join us

IPL 2026 Auction: आयपीएल लिलावाचा मुहूर्त ठरला; फक्त पत्रिका छापायचं बाकी; जाणून घ्या सविस्तर

IPL 2026 Auction Date: इथं एक नजर टाकुयात कधी अन् कुठं होणार आहे IPL २०२६ च्या हंगमाआधीचा लिलाव? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:48 IST

Open in App

IPL 2026 Likely Auction Date Retention Deadline :  क्रिकेट जगतातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या २०२६ च्या आगामी हंगामासाठी आणखी खूप वेळ आहे. पण त्याआधी सर्व फ्रँचायझी संघांना मिनी लिलावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघ मजबू करण्याची संधी असणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही आगामी आयपीएल हंगामा आधी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भातील तारखाही जवळपास निश्चित झाल्या आहेत. इथं एक नजर टाकुयात कधी अन् कुठं होणार आहे IPL २०२६ च्या हंगमाआधीचा लिलाव?  त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ठरलंय! IPL २०२६ च्या हंगामासाठी या तारखेला पार पडणार लिलाव प्रक्रिया?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रिया १३ ते १५ डिसेंबर दरम्यान पार पाडण्याच्या विचारात आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पण डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया होणार हे जवळपास निश्चित करण्यात आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

IPL रिटेन्शन डेडलाईन (रिलीज खेळाूंची यादी जाहीर करण्यासाठीची मुदत)

आयपीएल २०२६ साठी होणाऱ्या IPL मिनी लिलावाआधी रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी फ्रँयायझी संघांना १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.  दीपक हूडा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी आणि सॅम करन या सारखे खेळाडू रिलीज यादीत असतील. आगामी लिलावात चेन्नई सुपर किंग्जला चांगला डाव खेळता येईल. कारण आर. अश्विन याने निवृत्ती घेतल्यामुळे त्यांच्या पर्समध्ये खेळाडू रिलीज यादी तयार करण्याआधी ९.७५ कोटी रक्कम जमा आहे.

कुठं पार पडणाल यंदाची लिलाव प्रक्रिया?मागील दोन वर्षांत IPL लिलाव हा परदेशात घेण्यात आला होता. २०२३ मध्ये दुबई तर २०२४ मध्ये सौदी अरेबियातील जेद्दाह येथे लिलाव प्रक्रिया पार पडली. मात्र यावेळी BCCI भारतातच लिलाव घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. पुन्हा बंगळुरुमध्ये मैफिल रंगणार की अन्य कोणत्या शहराचा विचार होणार तेही लवकर कळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026 Auction: Dates Finalized, Details Revealed for Player Bidding

Web Summary : The IPL 2026 auction is likely scheduled for December 13-15. Teams have until November 15 to finalize released player lists. The venue is expected to be in India. Teams strategize for the upcoming season.
टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगबीसीसीआय