Join us

IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा

KL Rahul IPL 2026: 'त्या' संघाला एका चांगल्या कर्णधाराची गरज आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:55 IST

Open in App

सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. २-१ ने आघाडीवर असलेल्या इंग्लंडविरूद्ध भारतीय संघ आजपासून शेवटची कसोटी खेळत आहे. या कसोटी केएल राहुलची बॅट तळपली आहे. त्याने मालिकेत दोन शतके झळकावली आहेत. याचदरम्यान, अशी बातमी समोर आली आहे, जी राहुलच्या चाहत्यांसाठी खूपच आनंददायी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सऐवजीकोलकाता नाईट रायडर्सकडून खेळू शकतो. KKR संघ फार मोठी किंमत देऊन त्याला संघात घेऊ इच्छित आहे. केएल राहुलला IPL 2025मध्ये दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यावेळी त्याने १३ डावांमध्ये ५३९ धावा केल्या होत्या. त्याच्यासाठी तब्बल २५ कोटींची रक्कम देण्याची KKRची तयारी असल्याचे म्हटले जात आहे.

KKR ला केएल राहुलची गरज का?

केकेआरला कर्णधाराची गरज असल्याने ते केएल राहुलला खरेदी करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसतात. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही आणि त्याची कामगिरी खराब होती. पण आता केकेआर मोठ्या बदलाच्या मनःस्थितीत आहे. म्हणूनच ते केएल राहुलला संघात आणून त्याला कर्णधार बनवू इच्छितात. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की केकेआर केएल राहुलसाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे. केएल राहुल हा केवळ एक चांगला फलंदाजच नाही तर तो कर्णधार आणि यष्टीरक्षकाची भूमिका देखील बजावू शकतो. म्हणून केकेआर त्याच्यासाठी एवढी मोठी रक्कम देण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे.

IPL 2025मध्ये KKR ने चूक केली?

आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी केकेआरने मोठी चूक केली. आयपीएलची तिसरी ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरला त्यांनी संघात कायम ठेवले नाही. अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार बनला. अय्यरच्या जाण्यामुळे KKRला मोठे नुकसान सहन करावे लागले. प्रथम त्यांना कर्णधार बदलावा लागला. त्यानंतर संघाची खेळण्याची पद्धतही बदलली. संघ १४ पैकी फक्त ५ सामनेच जिंकू शकला. आता IPL 2026 च्या आधी त्यांनी मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनाही काढून टाकले आहे. एकेकाळी या संघाच्या गोलंदाजी युनिटला बळकटी देणारा भरत अरुण देखील लखनौमध्ये सामील झाला. आता केकेआर केएल राहुलला संघात आणून त्यांच्या संघाचे संतुलन साधण्याची तयारी करत आहे. पण दिल्ली कॅपिटल्स केएल राहुलला सोडणार का, हा सध्या मोठा प्रश्न आहे.६

टॅग्स :आयपीएल २०२४लोकेश राहुलदिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स