IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ६५ धावांनी मोठा विजय नोंदवला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 23:16 IST2026-04-02T23:13:15+5:302026-04-02T23:16:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 KKR vs SRH Sunrisers Hyderabad beat Kolkata Knight Riders by 65 runs secure first win of the campaign | IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय

IPL 2026 : KKR च्या बालेकिल्ल्यात SRH ऑरेंज आर्मी ठरली भारी! ईशान किशनचा कॅप्टन्सीतील पहिला विजय

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad, 6th Match : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने तीन वेळच्या IPL चॅम्पियनला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभवाचा दणका दिला आहे. २२७ धावांच्या विक्रमी धावसंख्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १६ व्या षटकात १६१ धावांत आटोपला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ईशान किशनच्या नेतृत्वाखाली ६५ धावांनी मोठा विजय नोंदवला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पहिल्यांदा फलंदाजी करताना SRH नं KKR समोर सेट केले होते विक्रमी टार्गेट

नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेनं या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा ४८ (२१) आणि ट्रॅविस हेड ४६(२१) यांनी दमदार सुरुवात करुन दिल्यावर हेन्री क्लासेन याने ५२ (३५) अर्धशतकासह दाखवलेला क्लास आणि नितिशकुमार  रेड्डीनं २४ चेंडूत केलेल्या ३९ धावांच्या जोरावर कोलकाता सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात २२६ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर २२७ धावांचे विक्रमी टार्गेट  सेट केले होते.

KKR vs SRH : विदर्भकराची कमाल! ४०० च्या स्ट्राइक रेटनं धावा काढणाऱ्या Finn Allen चा दुसऱ्याच चेंडूवर घेतला ...

२१ वर्षीय अंगक्रिष रंघुवंशीचं सलग दुसरे अर्धशतक, पण...

 या धावांचा पाठलाग करताना फिन ॲलन याने पहिल्याच षटकात २४ धावा करत केकेआरला आक्रमक सुरुवात करून दिली. पण तो दुसऱ्याच षटकात बाद झाला. २१ वर्षीय अंगक्रिश रंघवंशीनं सलग दुसरे अर्धशतक झळकावत संघाच्या आशा पल्लवित केल्या. पण तो २९ चेंडूत ५२ धावांवर धावबाद झाला. उप कर्णधार रिंकू सिंह या सामन्यात लयीत दिसला. पण ३५ धावांवर तोही माघारी फिरला अन् कोलकाताचा संघ फसला.

ईशानची शानदार कॅप्टन्सी अन् गोलंदाजांची कमाल 

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन याला या सामन्यात फलंदाजीत धमक दाखवू शकला नाही. पण धावांचा बचाव करताना त्याने कमालीची कॅप्टन्सी करत संघाला पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  केकेआरच्या स्फोटक सलामीवीर फिन ॲलन याच्या खेळीला ब्रेक लावण्यासाठी त्याने हर्ष दुबेवर खेळलेला पहिला डाव हा त्याच्या नेतृत्वाची खास झलक दाखवणारा होता. या गोलंदाजाशिवाय सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून जयदेव उनाडकट याने सर्वाधिक ३ तर इशान मलिंगा आणि नितीशकुमार रेड्डी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.  

Web Title : IPL 2026: KKR के गढ़ में SRH की शानदार जीत, किशन की कप्तानी में पहला विजय

Web Summary : सनराइजर्स हैदराबाद ने कोलकाता नाइट राइडर्स को 65 रनों से हराया। अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड और हेनरिक क्लासेन की शानदार बल्लेबाजी से SRH ने 227 रनों का लक्ष्य रखा। केकेआर की शुरुआत अच्छी रही, लेकिन वे SRH के गेंदबाजी आक्रमण के सामने टिक नहीं पाए। ईशान किशन की कप्तानी में SRH की शानदार जीत।

Web Title : SRH Dominates KKR in IPL 2026, Kishan Leads to Victory

Web Summary : Sunrisers Hyderabad defeated Kolkata Knight Riders by 65 runs in a high-scoring match. SRH set a target of 227, powered by Abhishek Sharma, Travis Head and Heinrich Klassen. KKR faltered despite a promising start, succumbing to SRH's dominant bowling attack under Ishan Kishan's captaincy.