IPL 2026 KKR vs PBKS Match Shah Rukh Khan Spotted With His Daughter Suhana Khan : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात पावसाच्या बॅटिंगशिवाय बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि सुहाना खान यांची खास झलक चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या KKR च्या संघाला चीअर करण्यासाठी शाहरुख खान आपल्या लेकीसोबत स्टेडियमवर पोहचला होता. पावासची बॅटिंग सुरु असताना कॅमेरा या दोघांकडे फिरला. पावसाच्या ब्रेकमधील खास क्षण दाखवणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KKR vs PBKS यांच्यातील लढतीत पावसाची बॅटिंग
गत उपविजेत्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर कोलकाताच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन षटकात कोलकाताच्या संघाने दोन विकेट्स गमावल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रंघुवंशी या जोडीवर सर्वांच्या नजरा खिळल्या असताना कोलकाताच्या डावातील चौथ्या षटकात पावसाला सुरुवात झाली. परिणामी ३. ४ षटकांत २५ धावांवर खेळ थांबवण्याची वेळ आली.
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
शाहरुख-सुहानाचा स्टायलिश अंदाज
KKR च्या संघाला चीअर करण्यासाठी पोहचल्या शाहरुख खानसह त्याची लेक सुहानाचा स्टायलिश अंदाज लक्षवेधी ठरला. दोघांनीही टीम-थीम आउटफिटमध्ये सर्वांचे लक्ष वेधले. शाहरुख खान हा कोलकता नाईट रायडर्सचा सह संघ मालक आहे. त्याने पांढऱ्या रंगाची KKR जर्सी, जीन्स आणि टीम कॅप असा लूक केला होता. सुहाना खानने KKR लोगो असलेला पांढरा शर्टसह लूक परिपूर्ण केला होता. या बाप लेकींसोबत शाहरुखची मॅनेजर ददलानी देखील उपस्थित होती. कोलकाता फ्रँचायझी संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवर शाहरुख-सुहानाच्या खास एन्ट्रीचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.
सामना झाला नाही तर PBKS पेक्षा KKR चं होईल नुकसान
यंदाच्या हंगामात गुणांचे खाते उघडण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा होता. पण पावसामुळे चाहत्यांसह KKR संघाचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार हा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल. याचा पंजाबच्या तुलनेत कोलकाता संघाला फटका बसेल. कारण पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Web Summary : Shah Rukh Khan and Suhana Khan were seen at the KKR vs PBKS match. Rain interrupted play at Eden Gardens. The stylish father-daughter duo sported KKR-themed outfits. A washout would hurt KKR more, who are seeking their first win.
Web Summary : शाहरुख खान और सुहाना केकेआर बनाम पीबीकेएस मैच में नजर आए। बारिश के कारण ईडन गार्डन्स में खेल बाधित हुआ। स्टाइलिश पिता-पुत्री की जोड़ी केकेआर-थीम वाले आउटफिट में नजर आई। बारिश से केकेआर को ज्यादा नुकसान होगा, जो अपनी पहली जीत की तलाश में है।