Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: KKRला मिळाला मुस्तफिजुरचा पर्याय; ऑस्ट्रेलियाला रडवणारा ६.८ फुटी गोलंदाज आला संघात

Blessing Muzarabani KKR IPL 2026: बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे मुस्तफिजुर रहमानला स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 20:15 IST

Open in App

Blessing Muzarabani KKR IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारमुळे बीसीसीआयने बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला IPL मधून बाहेर काढले होते. त्याच्या अनुपस्थितीत केकेआरचा संघ कुणाला खेळवणार हा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. या प्रश्नाचे अखेर उत्तर मिळाले असून तब्बल ६ फूट ८ इंच उंचीचा गोलंदाज त्यांच्या ताफ्यात सामील झाला आहे.

कोण आहे हा खेळाडू?

मुस्तफिजुर रहमानला यंदाच्या हंगामात बंदी घातल्याने तो उपलब्ध राहू शकत नव्हता. त्याने केकेआर व्यवस्थापनाला तसे कळवले. लिलावात केकेआरने त्याला त्याच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. त्याच्या जागी आता ब्लेसिंग मुझाराबानी याने संघात एन्ट्री केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि विविध टी२० लीगमध्ये आपल्या वेगाने आणि बाऊन्सने सर्वांना प्रभावित करणारा मुझाराबानी संघात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये करारबद्ध होणारा तो सिकंदर रझानंतर झिम्बाब्वेचा दुसरा खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्डकप मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाला संघाला नाकीनऊ आणले होते.

केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी मुझाराबानीच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर मुझाराबानीचा वेग आणि उंचीचा फायदा संघाला होईल, असा विश्वास मॅनेजमेंटला वाटत आहे. केकेआरने यंदाच्या हंगामासाठी आपल्या गोलंदाजी विभागात विविधता आणण्यावर भर दिला आहे. मुझाराबानीच्या समावेशामुळे संघाला डेथ ओव्हर्समध्ये एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

मुझाराबानीची आकडेवारी

मुझाराबानीने झिम्बाब्वेसाठी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या सामन्यांत चमकदार कामगिरी केली आहे. तो सातत्याने १४० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यात सक्षम आहे. IPL 2026च्या पहिल्या सामन्यात २९ मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध मुझाराबानी केकेआरच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दिसतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KKR finds Mustafizur replacement: 6.8ft Muzarabani joins IPL 2026 squad

Web Summary : Blessing Muzarabani replaces Mustafizur Rahman in KKR's IPL 2026 squad. The Zimbabwean pacer, known for his pace and bounce, was chosen by coach Chandrakant Pandit. Muzarabani's inclusion offers a strong bowling option, especially in death overs, adding variety to KKR's attack.
टॅग्स :आयपीएल २०२६झिम्बाब्वेकोलकाता नाईट रायडर्स