तीन वेळच्या आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझी संघाने संघातील स्टार ऑलराउंडर आंद्रे रसेलची १२ क्रमांकाची जर्सी रिटायर घोषित केली आहे. त्यामुळे आता KKR च्या ताफ्यात कोणत्याही खेळाडूला आता १२ क्रमांकाची जर्सी मिळणार नाही. कॅरेबियन मसल पॉवर रसेलनं KKR साठी मोठे योगदान दिले आहे. ही गोष्ट लक्षात ठेवूनच केकेआरनं त्याचा खास सन्मान केला. कोलकाता येथे पार पडलेल्या कार्यक्रमात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आंद्रे रसेलनं दोन वेळा उंचावलीये IPL ट्रॉफी
आंद्रे रसेल २०१४ पासून कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यातून खेळताना पाहायला मिळाले. २०२४ मध्ये त्याने दुसऱ्यांदा या संघाकडून IPL ट्रॉफी उंचावली होती. सध्याच्या घडीला तो सहाय्यक प्रशिक्षकाच्या रुपात नव्या जबाबदारीसह संघ कोलकाता नाइट रायडर्स संघासोबत आहे.
IPL मध्ये बाकावर बसून माफक पैसे कमावणारा क्रिकेटर झाला RCB चा सह मालक अन्...
KKR च्या सीईओंनी केली मोठी घोषणा
आयपीएलच्या नव्या हंगामातील मोहिमेला सुरुवात करण्याआधी कोलकाता येथे KKR फ्रँचायझीकडून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघाचे सीईओ वेंकी मैसूर (Venky Mysore) यांनी आंद्रे रसेल (Andre Russell) याची १२ क्रमांकाची जर्सी रिटायर केल्याची घोषणा केली. कॅरेबियन स्टारने KKR संघाला दिलेल्या बहुमोल योगदान आणि समर्पणाच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे फ्रँचायझीकडून सांगण्यात आले.
मसल पॉवर रसेल झाला भावूक
कोलकाताच्या संघाने गत हंगामात आंद्र रसेल याला रिटेन केले नव्हते. तो मिनी लिलावात येईल आणि केकेआर पुन्हा त्याला संधी दईल, अशी चर्चा रंगली. पण आंद्रे रसेल याने एक खास व्हिडिओ शेअर करत सहाय्यक प्रशिक्षकाच्या रुपात संघासोबत कायम राहणार असल्याची घोषणा केली. रसेल यांनी केकेआर संघ सोडून कोणत्याही अन्य संघाकडून खेळणार नाही, असेही बोलून दाखवले होते. तो शब्द त्याने पाळला अन् त्याला संघाकडून खास सन्मानही मिळाला. दोन वेळा आयपीएल ट्रॉफी उंचांवणे अवस्मरणीय होते, असे सांगत त्याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयापेक्षाही IPL चं जेतेपद खास असल्याचे सांगितले. यावेळी तो भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.