Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय

यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 23:46 IST

Open in App

Gujarat Titans vs Rajasthan Royals, 9th Match : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेला गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाला. रवी बिश्नोईनं फिरकीत कमाल दाखवल्यावर अखेरच्या षटकात तुषार देशपांडे याने ११ धावांचा यशस्वी बचाव करत राजस्थान रॉयल्सच्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय ठरला. दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्सच्या संघावर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली.     

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीसह ३१ (१८ , यशस्वी जैस्वाल ५५ (३६) आणि ध्रुव जुरेल यांच्या ७५ (४२) अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २१० धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्रा या जोडीनं गुजरात टायटन्सच्या डावाची दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली.

अहमदाबादच्या मैदानातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना साई सुदर्शनच्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्या १० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात १०३ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना गुजरातच्या बाजूनं सेट झाला होता. ११ व्या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने सेट झालेल्या साई सुदर्शनच्या खेळीला ब्रेक लावला. तो ४१ चेंडूत ७२ धावा करून परतला. पुढच्या षटकात  पहिल्याच चेंडूवर घातक ठरू शकेल अशा ग्लेन फिलिप्सला चालते केले.  याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरची शिकार करत बिश्नोईनं सामना राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं वळवला. १४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर नांद्रे बर्गर याने जोस बटलरला बाद करत सामन्यात ट्विस्ट आणले. गुजरातच्या संघाने ६ धावांत ३ विकेट्स गमावल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Bishnoi's magic, Deshpande's accuracy: Rajasthan's thrilling win over Gujarat!

Web Summary : Rajasthan Royals defeated Gujarat Titans in a thrilling last-ball encounter. Bishnoi's spin and Deshpande's final over heroics secured Rajasthan's second consecutive win. Suryavanshi, Jaiswal, and Jurel's fifties powered Rajasthan to a formidable total, while Gujarat faced their second straight defeat.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्स