बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय

यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 23:46 IST2026-04-04T23:45:46+5:302026-04-04T23:46:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 GT vs RR Rajasthan Royals Won By 6 Runs Against Gujarat Titans Ravi Bishnoi Take Sai Sudharsan Glenn Phillips Washington Sundar Tushar Deshpande Last Over Triller | बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय

बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय

IPL 2026 GT vs RR Rajasthan Royals Won By 6 Runs Against Gujarat Titans : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेला गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाला. रवी बिश्नोईनं आपल्या फिरकीची जादू दाखवल्यावर अखेरच्या षटकात तुषार देशपांडे याने ११ धावांचा यशस्वी बचाव करत राजस्थान रॉयल्सच्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय ठरला. दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्सच्या संघावर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली.     

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची दमदार सुरुवात

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीसह ३१ (१८ , यशस्वी जैस्वाल ५५ (३६) आणि ध्रुव जुरेल यांच्या ७५ (४२) अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २१० धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेल्या २११ धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि कुमार कुशाग्रा या जोडीनं गुजरात टायटन्सच्या डावाची दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली.

IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?

बिश्नोईच्या फिरकीची जादू दिसली, ९ चेंडूत ३ विकेट्स घेत त्याने मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

अहमदाबादच्या मैदानातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना साई सुदर्शनच्या दमदार खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्या १० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात १०३ धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना गुजरातच्या बाजूनं झुकला होता. ११ व्या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने सेट झालेल्या साई सुदर्शनच्या खेळीला ब्रेक लावला. तो ४१ चेंडूत ७२ धावा करून परतला. पुढच्या षटकात  पहिल्याच चेंडूवर बिश्नोईनं ग्लेन फिलिप्सला चालते केले.  याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरची शिकार करत बिश्नोईनं सामना राजस्थान रॉयल्सच्या बाजूनं वळवला. १४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर नांद्रे बर्गर याने जोस बटलरला बाद करत सामन्यात ट्विस्ट आणले. गुजरातच्या संघाने ६ धावांत ३ विकेट्स गमावल्या. संघ अडचणीत असताना या सामन्यात गिलच्या जागी नेतृत्व करणाऱ्या राशीद खान आणि रबाडा जोडीनं शेवटच्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सच्या विजयाची आस कायम ठेवली. 

अखेरच्या १२ चेंडूत १५ धावांची गरज असताना जोफ्रासह तुषार देशपांडेचा जलवा

अखेरच्या दोन षटकात गुजरात टायटन्सच्या संघाला १५ धावांची आवश्यकता होती. तीन विकेट्स हाती असल्यामुळे पुन्हा सामना गुजरातच्या बाजूनं झुकला. पण १९ व्या षटकात जोफ्रा आर्चरनं फक्त ४ धावा खर्च करत शेवटच्या षटकात ११ धावा ठेवल्या. रियान परागनं शेवटचं आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी चेंडू मराठमोळ्या तुषार देशपांडेच्या हाती सोपवला. त्याने पहिलाच चेंडू वाइड टाकला. पण त्यानंतर अचूक यॉर्करचा मारा करत त्याने धावांचा यशस्वी बचाव करत संघाच्या विजय निश्चित केला.

Web Title : बिश्नोई का जादू, देशपांडे की सटीक गेंदबाजी: राजस्थान की रोमांचक जीत!

Web Summary : राजस्थान रॉयल्स ने रोमांचक अंतिम गेंद के मुकाबले में गुजरात टाइटन्स को हराया। बिश्नोई की फिरकी और देशपांडे के अंतिम ओवर के पराक्रम ने राजस्थान को लगातार दूसरी जीत दिलाई। सूर्यवंशी, जायसवाल और जुरेल के अर्धशतकों ने राजस्थान को एक मजबूत स्कोर तक पहुंचाया, जबकि गुजरात को लगातार दूसरी हार का सामना करना पड़ा।

Web Title : Bishnoi's magic, Deshpande's accuracy: Rajasthan's thrilling win over Gujarat!

Web Summary : Rajasthan Royals defeated Gujarat Titans in a thrilling last-ball encounter. Bishnoi's spin and Deshpande's final over heroics secured Rajasthan's second consecutive win. Suryavanshi, Jaiswal, and Jurel's fifties powered Rajasthan to a formidable total, while Gujarat faced their second straight defeat.