Ashok Sharma Clocks 154.2 kmph Fastest Delivery In IPL 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत अशोक शर्मा याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. गुजरात टायटन्सच्या ताफ्यातील नेहराच्या मोहऱ्यानं ताशी १५४.२ वेगाने चेंडू टाकत सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले आहे. आयपीएलमधील आपल्या दुसऱ्याच सामन्यात २३ वर्षीय गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात GT च्या अशोक शर्मानं दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्खियाचा विक्रम मागे टाकला. इथं जाणून घेऊयात यंदाच्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या आघाडीच्या पाच गोलंदाजांच्या खास विक्रमावर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०२२ पासून वेगवेगळ्या फ्रँचायझीचा भाग; पण...
१७ जून २००२ मध्ये राजस्थानमध्ये जन्मलेला हा क्रिकेटर मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या फ्रँचायझी संघासोबत दिसत आहे. २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ५५ लाख रुपये एवढी किंमत मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. पण त्यांनी या गोलंदाजाला पदार्पणाची संधी दिली नाही. २०२५ च्या हंगामात तो नेट बॉलरच्या रुपात राजस्थानच्या संघासोबत होता.
GT नं दिली IPL पदार्पणाची संधी
२०२६ च्या हंगामाआधी झालेल्या मिनी लिलावात भारताचा माजी जलदगती गोलंदाज आणि आयपीएलमध्ये पडद्यामागून गुजरात टायटन्सची सूत्रे हलवणाऱ्या आशिष नेहरानं त्याच्यावर डाव लावला. ९० लाख रुपयांसह त्याला GT नं आपल्या ताफ्यात घेतलं. पंजाब विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याला पदार्पणाची संधीही देण्यात आली. या सामन्यात त्याने १ विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवली. आता राजस्थानविरुद्ध त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकताना ४ षटकांच्या कोट्यात ३७ धावा खर्च करून एक विकेट आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. तयाने आतापर्यंत ११ टी २० सामने खेळले असून यात ३३ विकेट्स मिळवल्या आहेत.
IPL 2026: कोण आहे Ashok Sharma? नेहरानं हेरलेला ‘मोहरा’; ताशी १५० kmph वेगाने करतो भेदक मारा
IPL 2026 च्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू फेकणाऱ्या आघाडीच्या ५ गोलंदाजांमध्ये २ भारतीय
अशोक शर्मा हा ताशी १५४.२ किमी वेगाने टाकलेल्या चेंडूसह यंदाच्या हंगामात सर्वात जलद चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. त्यापाठोपाठ लखनौच्या ताफ्यातील एनरिक नॉर्खिया हा दुसऱ्या स्थानावर आहे. या परदेशी गोलंदाजाने ताशी १५०.९ कि.मी. वेगाने चेंडू फेकला आहे. या यादीत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळणारा भारताचा कार्तिक त्यागी १४९.७ kmph वेगवान चेंडू टाकण्यासह तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या कगिसो रबाडाने यंदाच्या हंगामात १४९.१ kmph तर चेन्नई सुपर किंग्सकडून जेमी ओव्हर्टन याने १४५.६ १४९.१ kmph वेगाने चेंडू टाकल्याचा रेकॉर्ड आहे.