IPL 2026 च्या १९ व्या हंगामातील अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या नवव्या लढतीत टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याला IPL मधील युवा कर्णधार रियान पराग टक्कर देताना दिसेल. गत हंगामात कार्यवाहू कर्णधाराच्या रुपात दिसलेल्या रियान पराग यंदाच्या हंगामापासून राजस्थान रॉयल्सचा नियमित कर्णधार झाला आहे. पहिल्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाखालील संघाने रॉयल विजयही मिळवला. दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या संघाला गिलच्या नेतृत्वाखाली पराभवाचा सामना करावा लागला होता. तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणारा गिल टी-२० क्रिकेटमध्ये धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी या सामन्यात फलंदाजीसह नेतृत्वाची धमक दाखवण्याचे आव्हान असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या तिघांच्या खांद्यावर असेल GT च्या बॅटिंगची धूरा
गुजरात टायटन्सच्या संघाला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. घरच्या मैदानातील सामना जिंकून २ गुण आपल्या खात्यात जमा करण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील. गत हंगामात GT च्या ताफ्यातील साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी कमालीची कामगिरी करुन दाखवली होती. पण यंदाच्या हंगामात दोघांनाही चांगली सुरुवात करता आलेली नाही. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सपशेल अपयशी ठरलेल्या जोस बटलर लयीत दिसला. पण मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला होता. फलंदाजीत या तिघांकडून दमदार खेळीची अपेक्षा असेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे गिलसाठी खास ठरले आहे. मोठ्या खेळीसह तो मैफील लुटणार का? ते पाहण्याजोगे असेल.
RR कडून वैभव सूर्यवंशीचा आणखी एक हिट शो पाहायला मिळणार?
राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालसह १५ वर्षीय युवा बॅटर वैभव सूर्यवंशी याने दमदार सुरुवात केली आहे. ही जोडी जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर पुन्हा धमाका करणार का? ते पाहण्याजोगे असेल. वैभव सूर्यवंशी हा मिड विकेट आणि मिडऑफच्या दिशेनं सर्वाधिक धाव ठोकतो. या युवा बॅटरसमोर सिराज आणि कगिसो रबाडासह अनकॅप्ड जलदगती गोलंदाज अशोक शर्मा आणि राशीद खानचं चॅलेंज असेल.
GT vs RR हेड टू हेड रेकॉर्ड
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात IPL मध्ये आतापर्यंत ८ सामने खेळवण्यात आले आहेत. यात गुजरातच्या संघाने ६ तर राजस्थानने २ सामने जिंकले आहेत. राजस्थान विरुद्ध सर्वच्या सर्व ८ सामन्यात शुभमन गिल मैदानात उतरला असून या फ्रँचायझीविरुद्ध गुजरातच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. आतापर्यंतत्याने ३३२ धावा केल्या असून ८४ ही त्याची राजस्थानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे.
सामना कधी अन् कुठं रंगणार?
- GT vs RR सामन्याची तारीख: शनिवार, ४ एप्रिल, २०२६
- वेळ: सायंकाळी ७:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- सामन्याचे ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद
भारतामध्ये कुठे पाहता येईल GT vs RR यांच्यातील सामना?
- जिओहॉटस्टार ॲप /वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग
- स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल्सवर थेट प्रसारण
गुजरात टाययटन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, एम शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशीद खान, कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराजइम्पॅक्ट प्लेयर : प्रसिद्ध कृष्णा
राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन
वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा. इम्पॅक्ट प्लेयर : ब्रिजेश शर्मा, रवी सिंग, शुभम दुबे
Web Summary : Shubman Gill's Gujarat Titans face Riyan Parag's Rajasthan Royals. Gill seeks form, while Parag aims for victory after a strong start. Key players include Sai Sudharsan and young Vaibhav Suryavanshi. The head-to-head record favors Gujarat, but Rajasthan seeks to even the score.
Web Summary : शुभमन गिल की गुजरात टाइटन्स का सामना रियान पराग की राजस्थान रॉयल्स से होगा। गिल फॉर्म में लौटने की कोशिश करेंगे, जबकि पराग मजबूत शुरुआत के बाद जीत का लक्ष्य रखेंगे। साई सुदर्शन और युवा वैभव सूर्यवंशी जैसे प्रमुख खिलाड़ी शामिल हैं। हेड-टू-हेड रिकॉर्ड गुजरात के पक्ष में है, लेकिन राजस्थान बराबरी करना चाहेगा।