तब्बल पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघासाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात ही कमालीची निराशाजनक झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चेन्नईचा पुढील सामना येत्या शनिवारी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाशी होणार असून, या लढतीपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला चेन्नईचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि युवा फलंदाज डोवॉल्ड ब्रेव्हिस हे पुढच्या सामन्यातून संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनीची पुढच्या काही दिवसांत फिटनेस टेस्ट होणार असून, त्यात तो पास झाला तर शनिवारी चेपॉकवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी खेळताना दिसणार आहे. याचप्रमाणे युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस हासुद्धा दुखापतीतून सावरत असून, तोही पुढच्या लढतीत खेळू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
चेन्नईचा यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीला प्री सिझन कॅम्पदरम्यान, दुखापत झाली होती. त्यामुळे अनफिट झाल्याने धोनी हा यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या तीन सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाकडून खेळू शकला नव्हता. मात्र आता अनुभवी धोनी संघात परतल्यास चेन्नईला मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस हा संघात आल्याने कमकुवत भासत असलेल्या चेन्नईच्या मधल्या फळीला मोठा आधार मिळणार आहे.
Web Summary : After three consecutive losses, Chennai Super Kings receive a boost. Dhoni and Brevis are likely to return for the upcoming match against Delhi Capitals, strengthening the team's batting lineup. Dhoni's fitness test will determine his availability.
Web Summary : लगातार तीन हार के बाद, चेन्नई सुपर किंग्स को बढ़ावा मिला। धोनी और ब्रेविस के दिल्ली कैपिटल्स के खिलाफ आगामी मैच में वापसी करने की संभावना है, जिससे टीम की बल्लेबाजी लाइनअप मजबूत होगी। धोनी का फिटनेस टेस्ट उनकी उपलब्धता निर्धारित करेगा।