आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामाआधी खेळाडूंच्या दुखापतीमुळे अनेक फ्रँचायझी संघांची डोकेदुखी वाढली आहे. २८ मार्चला गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीनं नव्या हंगामाची सुरुवात करणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्स सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने ईशान किशनकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघही मॅच विनर जोश हेजलवूडशिवाय मैदानात उतरणार आहे. इथं एक नजर टाकुया आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून कोणी माघार घेतली? कोण सुरुवातीच्या सामन्याला मुकणार यासंदर्भातील सविस्तर माहिती
"एकही प्याला नको रे बाबा!" चहलनं दारु सोडली; एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारताना तो नेमकं काय म्हणाला?
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासह या फ्रँचायझी संघातील खेळाडू संपूर्ण स्पर्धेला मुकणार
- हर्षित राणा गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाला मुकणार आहे. त्याच्या पाठोपाठ आकाशदीपही यंदाच्या हंगामाला मुकणार
- चेन्नई सुपर किंग्स- नॅथन एलिस हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर
- राजस्थान रॉयल्स- ग्रोइन दुखापतीमुळे इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करन संपूर्ण हंगामातून माघारी घेतली आहे.
- जॅक एडवर्ड्स (SRH ) हा पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून माघार घेतली आहे.
हे स्टार सुरुवातीच्या सामन्याला मुकणार, कारण...सनरायझर्स हैदराबाद- SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्याला मुकणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यानंतरच्या सामन्यात तरी तो उपलब्ध होणार का? तो जॉईन झाल्यावर कॅप्टन्सी पुन्हा त्याच्याकडे सोपवण्यात येणार का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- RCB संघ यंदाच्या हंगामात जोस हेजलवूडशिवाय मैदानात उतरणार आहे. तो अखेरच्या टप्प्यात तरी उपलब्ध होणार का? ते पाहण्याजोगे असेल.
- पंजाब किंग्स- लॉकी फर्ग्यूसन याने कुटुंबियांना वेळ देण्याला पसंती दिली असून तो उशीराने IPL स्पर्धेत सहभागी होणार आहे
- दिल्ली कॅपिटल्स - वर्कलोड मॅनेटमेंटमुळे मिचेल स्टार सुरुवतीच्या काही सामन्यात खेळणार नाही.
- लखनौ सुपर जाएंट्स- जॉश इंग्लिस १८ एप्रिलला विवाह बंधनात अडकणार आहे. त्यामुळे तो बहुतांश सामन्यांना मुकणार आहे.
Web Summary : Injuries and personal commitments impact IPL 2026. Key players like Cummins, Hazlewood, and Curran will miss matches. Rana and Ellis are out for the season. Ferguson and Inglis will join late due to family and marriage, respectively, affecting team strategies.
Web Summary : चोटों और निजी कारणों से आईपीएल 2026 प्रभावित। कमिंस, हेजलवुड और करन जैसे प्रमुख खिलाड़ी मैच नहीं खेलेंगे। राणा और एलिस पूरे सीजन से बाहर हैं। फर्ग्यूसन और इंग्लिस क्रमशः परिवार और शादी के कारण देर से जुड़ेंगे, जिससे टीम की रणनीतियां प्रभावित होंगी।