IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!

Virat Kohli gift Vaibhav Suryavanshi: राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहलीने वैभव सूर्यवंशीला खास गिफ्ट दिले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:43 IST2026-04-11T12:41:22+5:302026-04-11T12:43:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Former RCB captain Virat Kohli gave special gift to Rajasthan Royals Vaibhav Suryavanshi | IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!

आयपीएल २०२५ च्या सुरुवातीपासूनच राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध काल खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या २६ चेंडूत ७८ धावांची खेळी करून गोलंदाजांची संपूर्ण रणनीतीच उधळून लावली. वैभव सूर्यवंशीच्या या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने हा सामना सहा विकेट्सने जिंकला. वैभव सूर्यवंशी फलंदाजी पाहून आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली भारावून गेला. सामन्यानंतर विराटने त्याला खास गिफ्ट दिले आहे.

आरसीबीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने हा सामना एकतर्फी करून टाकला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याच्यासमोर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवुडसारखे अनुभवी गोलंदाजही दिसून आले. सामना संपल्यावर, सूर्यवंशी विराट कोहलीकडे त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी गेला. त्यावेळी विराट कोहीलीने वैभव सूर्यवंशीच्या टोपीवर प्रिय वैभव, खूप छान खेळलास, असे लिहिले. क्रिकेट क्षेत्रातील एका दिग्गज खेळाडूकडून मिळणारी अशी प्रशंसा, कोणत्याही युवा खेळाडूसाठी एक प्रचंड मोठी उपलब्धी असते.

राजस्थानचा सलग चौथा विजय

वैभव सूर्यवंशीच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने सलग चौथा विजय नोंदवला. आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ ८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. शिवाय, ऑरेंज कॅपदेखील वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे.  कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आला. राजस्थानचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात राजस्थानचा संघ आपली विजयी घोडदौड सुरू ठेवतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title : आईपीएल 2026: वैभव सूर्यवंशी की बल्लेबाजी पर कोहली फिदा, दिया खास तोहफा!

Web Summary : वैभव सूर्यवंशी की तूफानी बल्लेबाजी से राजस्थान की जीत हुई। कोहली प्रभावित हुए और उन्हें एक हस्ताक्षरित टोपी भेंट की, उनके प्रदर्शन की सराहना की। राजस्थान ने लगातार चौथी जीत हासिल की और अंक तालिका में शीर्ष पर है।

Web Title : IPL 2026: Kohli Impressed by Suryavanshi's Batting, Gives Special Gift!

Web Summary : Vaibhav Suryavanshi's explosive batting led Rajasthan to victory. Kohli, impressed, gifted him a signed cap, praising his performance. Rajasthan secured their fourth consecutive win and leads the points table.