IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

जोस बटलरची कडक फिफ्टी, GT कडून खेळताना खास विक्रमाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:51 IST2026-04-08T20:49:56+5:302026-04-08T20:51:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs GT Jos Buttler Fifty After 16 T20 Innings He Enters 600 Sixes Club In T20 Cricket After Chris Gayle Kieron Pollard Andre Russell Nicholas Pooran | IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करताना दिसलेला इंग्लंडचा स्फोटक बॅटर जोस बटलर याने गुजरात टायटन्सकडून IPL मधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. उत्तुंग फटकेबाजीसह १६ डावानंतर अर्धशतक झळकावताना बटलरनं सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री मारली. अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात जोस बटलर याने टी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारण्याचा पल्ला गाठला. हा टप्पा पार करणारा बटलर टी-२० जगतातील पाचवा फलंदाज ठरला. DC च्या गोलंदाजांची धुलाई करताना त्याने एका डावात अनेक विक्रमांना गवसणी घातली. इथं नजर टाकुयात त्याने सेट केलेल्या खास विक्रमांवर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जोस बटलरची कडक फिफ्टी, GT कडून खेळताना खास विक्रमाला गवसणी

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाची सुरुवात खराब झाली. साई सुदर्शनच्या रुपात संघाला पहिला धक्का बसल्यावर जोस बटलर मैदानात उतरला. २४ चेंडूत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. कुलदीप यादवनं चौथ्यांदा त्याची शिकार करताना ५२ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला. या खेळीत त्याने ३ चौकारांसह ५ उत्तुंग षटकार मारत खास विक्रम आपल्या नावे नोंदवला. 

अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट

टी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार मारणारा पाचवा बॅटर ठरला बटलर

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये हजारहून अधिक षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याच्याशिवाय केरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि निकोलस पूरन यांनी टी-२० क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. या यादीत आता जोस बटलरचीही एन्ट्री झाली आहे.  

  • ख्रिस गेल : १०५६ षटकार
  • केरॉन पोलार्ड  : ९८१ षटकार
  • आंद्रे रसेल : ७८४ षटकार
  • निकोलस पूरन  : ७१२ षटकार
  • जोस बटलर : ६००  षटकार

पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा खास विक्रम

सलामीवीराशिवाय पहिल्या ६ षटकात सर्वाधिक ५ षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जोस बटलर दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत सुरेश रैना अव्वलस्थानी आहे. २०१४ च्या हंगामात रैनानं CSK कडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पंजाबच्या संघाविरुद्धच्या क्वॉलिफायर २ मध्ये पहिल्या ६ षटकात ६ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
 

Web Title : IPL 2026: बटलर की तूफानी बल्लेबाजी, छक्कों के एलिट क्लब में एंट्री।

Web Summary : जोस बटलर ने डीसी के खिलाफ शानदार अर्धशतक बनाया, 5 छक्के लगाए। उन्होंने 600 टी20 छक्के पूरे किए, और गेल, पोलार्ड, रसेल और पूरन के एलिट क्लब में शामिल हो गए। उन्होंने पावरप्ले में 5 छक्के भी लगाए, जो रैना के रिकॉर्ड के बाद दूसरे नंबर पर है।

Web Title : IPL 2026: Buttler's explosive batting enters elite six-hitting club.

Web Summary : Jos Buttler smashed a brilliant fifty against DC, hitting 5 sixes. He reached 600 T20 sixes, joining Gayle, Pollard, Russell, and Pooran in the elite club. He also hit 5 sixes in the powerplay, only behind Raina's record.