दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने दिलेल्या विक्रमी २११ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कडक रिप्लाय दिला. लोकेश राहुल आणि केअल राहुल जोडीनं पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची दमदार भागीदारी रचली. प्रसिद्ध कृष्णानं दिल्लीच्या संघाला पहिला धक्का देत गुजरात टायटन्सच्या मोठा दिलासा दिला. त्यानंतर राशीद खान याने नितीश राणा आणि समीर रिझवीला एकाच षटकात माघारी धाडत दिल्लीच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. मग लोकेश राहुलची साथ देण्यासाठी डेवि़ड मिलर मैदानात उतरला. पण १० चेंडूत १२ धावा करून त्याने वेदनेनं व्याकूळ होऊन मैदान सोडलं. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं? किलर मिलरवर का आली मैदान सोडण्याची वेळ
धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १३ व्या षटकानंतर डेविड मिलरनं मैदान सोडलं. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. गुजरात टायटन्सच्या डावात क्षेत्ररक्षण करता वेळी एक चेंडू अडवताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. फलंदाजी करताना फटका मारला की, त्याला वेदना जाणवत होत्या. त्यामुळेच त्याने अखेर मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. पण १७ व्या षटकात स्टब्सच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सचा अर्धा संघ तंबूत परतल्यावर मिलर दुखापतीतून सावरून पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
GT पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत, DC ला विजयी हॅटट्रिकचा डाव साधण्याची संधी
गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना शुभमन गिल, जोस बटलर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१० धावा करत दिल्ली कॅपिटल्ससमोर २११ धावांचे आव्हान ठेवले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने याआधी एवढ्या धावांचा पाठलाग कधीही केलेला नाही. दिल्लीचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरला असून गुजरात टायटन्स खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Web Summary : During Delhi's chase of 211, Miller retired hurt due to a finger injury sustained while fielding. He briefly returned, as Delhi aimed for a win, while Gujarat sought their first victory. GT set a target of 211 runs.
Web Summary : दिल्ली के 211 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए मिलर फील्डिंग के दौरान उंगली में चोट लगने के कारण रिटायर्ड हर्ट हो गए। गुजरात पहली जीत के लिए संघर्ष कर रही है, जबकि दिल्ली जीत की हैट्रिक बनाना चाहती है। GT ने 211 रनों का लक्ष्य रखा।