IPL 2026 : MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं! १४.२० कोटींचा 'वीर' जखमी; नेमकं काय घडलं?

MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं; जाणून घ्या त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 21:36 IST2026-01-23T21:34:57+5:302026-01-23T21:36:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK Player Prashant Veer Injured During Uttar Pradesh Ranji Trophy Match Against Jharkhand In Lucknow | IPL 2026 : MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं! १४.२० कोटींचा 'वीर' जखमी; नेमकं काय घडलं?

IPL 2026 : MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं! १४.२० कोटींचा 'वीर' जखमी; नेमकं काय घडलं?

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा (IPL 2026) बिगुल मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात लोकिप्रिय टी-२० लीगच्या वेळापत्रकाची चाहते अगदी उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. आगामी हंगामासाठी मिनी लिलावात काही संघांनी मजबूत संघ बांधणी केल्याचे पाहायला मिळाले. यात CSK चा संघ आघाडीवर राहिला. लिलावात जपून पैसा खर्च करणाऱ्या या फ्रँचायझी संघाने अनकॅप्ड खेळाडूंवर मोठी आणि विक्रमी बोली लावल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

MS धोनीच्या CSK चं टेन्शन वाढलं

पण चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ज्या खेळाडूवर पाण्यासारखा पैसा ओतला तो खेळाडू नकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. मिनी लिलावात १२ कोटी २० लाख रुपये मोजून CSK च्या संघाने ज्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर मोठा डाव खेळला तो दुखापतग्रस्त झाला आहे. ही गोष्ट महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे टेन्शन वाढवणारी आहे. 

हर्षित राणाचा कहर! न्यूझीलंडच्या धाकड फलंदाजासाठी ठरतोय कर्दनकाळ; सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

नेमकं काय घडलं?

IPL च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने अनकॅप्ड प्रशांत वीर या अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर विक्रमी बोली लावली होती. हा खेळाडू रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळतो. झारखंड विरुद्धच्या सामन्यात डावखुरा स्पिन ऑलराउंडर प्रशांत वीर दुखापतग्रस्त झाला आहे.  उत्तर प्रदेशचा संघ सहावा सामना झारखंडविरुद्ध लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी मिड-ऑफवर फील्डिंग करताना प्रशांत वीर जखमी झाला. झारखंडचा फलंदाज शिखर मोहन याने मारलेला फटका अडवण्याच्या प्रयत्नात प्रशांतने उजव्या बाजूला डाईव्ह मारली, मात्र यावेळी त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. फिजिओने तात्काळ मैदानावर येऊन तपासणी केल्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं.

तो IPL च्या आगामी हंगामातील पहिल्या काही सामन्याला मुकण्याची शक्यता  

ESPN Cricinfo च्या वृत्तानुसार प्रशांत वीरला ग्रेड-२ शोल्डर टिअर झाला असून, पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला किमान तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे IPL 2026 च्या हंगामातील पहिल्या काही लढतींना तो मुकण्याची शक्यता आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेला हा खेळाडू लवकरात लवकर फिट व्हावा, अशीच CSK च्या चाहत्यांची इच्छा असेल.
 

Web Title : IPL 2026: MS धोनी की CSK की बढ़ी टेंशन, वीर घायल!

Web Summary : CSK के 14.20 करोड़ रुपये के खिलाड़ी, प्रशांत वीर, रणजी ट्रॉफी मैच में घायल हो गए। वह शुरुआती IPL 2026 के खेल मिस कर सकते हैं, जिससे CSK प्रशंसक चिंतित हैं।

Web Title : IPL 2026: CSK's tension rises as Veer gets injured!

Web Summary : CSK's ₹14.20 crore signing, Prashant Veer, suffered a shoulder injury during a Ranji Trophy match. He might miss initial IPL 2026 games, concerning CSK fans.