Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: भुवनेश्वर कुमार इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; पहिल्याच सामन्यात महाविक्रमाची संधी!

Bhuvneshwar Kumar: आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे मोठा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:12 IST

Open in App

आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा बिगुल वाजला असून, २८ मार्च रोजी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सलामीच्या सामन्यात हैदराबादचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे.

या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असल्या तरी, गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार आकर्षणाचे केंद्र असेल. भुवनेश्वरने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केवळ २ विकेट्स घेतल्या. तर, तो आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा जगातील दुसरा आणि पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल. आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ युझवेंद्र चहल यानेच २०० विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. चहलने १७४ सामन्यांत २२१ विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर सध्या १९० सामन्यांत १९८ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:

१) युझवेंद्र चहल: २२१ विकेट्स२) भुवनेश्वर कुमार: १९८ विकेट्स३) सुनील नरायण: १९२ विकेट्स४) पियुष चावला: १९२ विकेट्स५) रविचंद्रन अश्विन: १८७ विकेट्स

टी-२० क्रिकेटमध्येही मोठ्या विक्रमाची संधी

भुवनेश्वर कुमार केवळ आयपीएलमध्येच नव्हे, तर एकूण टी-२० क्रिकेटमध्येही भारतीय गोलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत ३३५ विकेट्स घेतल्या असून तो भारताचा तिसरा यशस्वी टी-२० गोलंदाज आहे. या हंगामात त्याने आपली लय कायम राखली, तर तो ३५० टी-२० विकेट्स पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरू शकतो.

टी-२० क्रिकेटमधील टॉप भारतीय गोलंदाज:

१) युझवेंद्र चहल- ३८४ विकेट्स२) जसप्रीत बुमराह- ३४५ विकेट्स३) भुवनेश्वर कुमार- ३३५ विकेट्स४) पियुष चावला - ३२७ विकेट्स५) आर अश्विन - ३१७ विकेट्स

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Bhuvneshwar Kumar eyes history, milestone in first match.

Web Summary : Bhuvneshwar Kumar can reach 200 IPL wickets in the opening match between RCB and SRH. He needs two wickets to become the first Indian pacer and second overall to achieve this feat. He also eyes 350 T20 wickets.
टॅग्स :आयपीएल २०२६भुवनेश्वर कुमाररॉयल चॅलेंजर्स बेंगलोर