Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली

सोशल मीडियावर काव्या मारनचे लिलावातील एन्ट्री मारतानाचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:41 IST

Open in App

IPL 2026 Auction Kavya Maran At Etihad Arena Abu Dhabi Stylish Look Pics Goes Viral : आयपीएलचा लिलाव असो वा मॅच सनरायझर्सची मालकीण काव्या मारनची झलक दिसणार नाही, असे होत नाही. आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी १० फ्रँचायझी संघ अबू धाबीच्या एतिहाद अरेना येथे जमले आहेत. लिलावाला सुरुवात होण्याआधी काव्या मारनची कडक एन्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. तिची झलक दिसताच लिलावाआधी तिच्या स्टायलिश लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर काव्या मारनचे लिलावातील एन्ट्री मारतानाचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.  

सनरायझर्स संघाची बांधणी करताना काव्या मारन नेहमीच ऑक्शन टेबलवर हजेरी लावताना पाहायला मिळाले आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ मिनी लिलावात २५.५० कोटी पर्ससह लिलावात उतरला आहे. १० खेळाडूंवर ते बोली लावताना दिसतील. खेळाडूंवर लागणाऱ्या बोलीशिवाय  काव्या मारन यावेळीही ऑक्शन टेबलवरील चर्चित चेहरा ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kavya Maran's Stylish Look at IPL 2026 Auction Sparks Buzz

Web Summary : Kavya Maran's presence at the IPL 2026 auction in Abu Dhabi is creating a stir. The Sunrisers owner's stylish appearance is being widely discussed on social media. Her entry has become a major talking point as Sunrisers Hyderabad prepares to bid with a 25.50 crore purse.
टॅग्स :आयपीएल लिलाव 2026आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगसनरायझर्स हैदराबादकाव्या मारन