IPL 2026 Auction : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील १९ व्या हंगामाच्या आधी (IPL 2026) लोकप्रिय स्पर्धेतील सहभागी फ्रँचायझी संघांनी मिनी लिलावात मोठा डाव खेळत मजबूत संघ बांधणीची तयारी जवळपास सुरु केली आहे. कोणत्या खेळाडूला संघात कायम ठेवायचं आणि कोणत्या खेळाडूला नारळ द्यायचा? यासंदर्भात लवकरच सर्व फ्रँचायझी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करतील. त्यानंतर मिनी लिलावाचा मार्ग मोकळा होईल. रिटेन रिलीजचं चित्र स्पष्ट झाल्यावर लिलाव कधी होणार यासंदर्भातील माहिती आता समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL च्या आगामी हंगामाआधी होणाऱ्या लिलावाची तारीख ठरली, पण...
आयपीएल २०२६ साठी डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. क्रिकबझने IPL फ्रँचायझींशी संलग्नित अधिकाऱ्यांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, १३ ते १५ डिसेंबर या दरम्यान आगामी हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
संजूला मोठी डिमांड! जड्डू-सॅम या दोन स्टार खेळाडूंच्या बदल्यात CSK–RR मध्ये होणार मेगा ट्रेड?
या वेळी मायदेशातच पार पडणार लिलाव?
आयपीएलच्या मागील दोन हंगामासाठी दुबई (२०२३) आणि सौदी अरेबियातील जेद्दाह (२०२४) येथे लिलाव प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आयपीएल २०२६ च्या हंगामाआधी होणारा लिलाव कुठं पार पडणार? हा मुद्दाही चर्चेत आहे. यासंदर्भातील उत्तरही अजून गुलदस्त्यात असले तरी यंदाची लिलाव प्रक्रिया ही भारतातील शहरात पार पाडणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
खेळाडू रिटेन्शनची अंतिम मुदत कधीपर्यंत?
लिलावाआधी खेळाडू रिटेन रिलीजचा खेळ पाहायला मिळेल. यासंदर्भात IPL स्पर्धेत सहभागी सर्व फ्रँचायझींनी फिल्डिंगही लावली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझी संघांना संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. या खेळात ट्रेड विंडोच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून CSK संजू सॅमसनवर मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. या दोन संघाशिवाय अन्य संघात फार बदल अपेक्षित नाही.