Join us
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा

धक्क्यावर धक्का! लिलावात शेवटच्या टप्प्यात मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 21:43 IST

Open in App

IPL 2026 Auction Prithvi Shaw Sold To Delhi Capitals : आयपीएल २०२६ स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी अबू धाबीच्या एतिहाद अरेना येथे खेळाडूंच्या  लिलाव पार पडला. या मिनी लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली असताना भारतीय स्टार क्रिकेटर्सवर अनसोल्ड राहण्याची वेळ आली. गत हंगामात अनसोल्डचा टॅग लागलेल्या पृथ्वी शॉ मिनी लिलावात पहिल्या सेटमध्ये होता. दोन वेळा अनसोल्ड राहिल्यावर अखेर जुन्या संघाने त्याच्यावर भरवसा दाखवला अन् पुन्हा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. तिसऱ्या एक्सेलेटर राउंडमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ७५ लाख या मूळ किंमतीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पृथ्वीला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

धक्क्यावर धक्का! लिलावात शेवटच्या टप्प्यात मिळाला दिलासा

भारतीय क्रिकेटमधील एकेकाळचा सुपरस्टार असलेला पृथ्वी शॉची कारकिर्द ही चढ उतारांची राहिली आहे. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे आधी त्याने टीम इंडियातील स्थान गमावले. त्यानंतर IPL २०२५ च्या मेगा लिलावातही त्याला कोणी भाव दिला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघानेही त्याला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. धक्क्यावर धक्के बसत असताना पृथ्वीनं शॉ मुंबई संघ सोडून महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. रणजी सामन्यासह सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने फलंदाजीतील धमक दाखवली आणि दिल्लीनं लिलावाच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवल्याचे दिसून आले. 

मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात

प्रत्येक हंगामात तो DC कडून मैदानात उतरला! कसा आहे त्याचा IPL मधील रेकॉर्ड

पृथ्वी शॉ याने २०१८ च्या हंगामात IPL मध्ये पदार्पण केले. त्या हंगामात दिल्लीच्या संघानं (त्यावेळीचे नाव दिल्ली डेअरडव्हिल्स) त्याच्यासाठी १ कोटी २० लाख रूपये मोजले होते. पदार्पणाच्या हंगामातच पृथ्वी शॉचा धमाकाही पाहायला मिळाला. पदार्पणानंतर प्रत्येक हंगामात तो दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसला. IPL मध्ये दिल्लीच्या संघाकडून त्याने आतापर्यंत ७९ सामन्यात २३.९५ च्या स्ट्राइक रेटसह  १८९२ धावा केल्या आहेत. यात १४ शतकांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prithvi Shaw Finds Buyer: Delhi Capitals Buys Him Back!

Web Summary : After going unsold twice, Prithvi Shaw was finally bought by Delhi Capitals for his base price in the IPL 2026 auction. His domestic performance swayed the team to bring him back, continuing his IPL journey.
टॅग्स :आयपीएल लिलाव 2026आयपीएल २०२४आयपीएल २०२६बीसीसीआयपृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्सइंडियन प्रीमिअर लीग