IPL 2026 Auction Date And Venue : क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी डिसेंबरमध्ये मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. आगामी हंगामासाठी संघ बांधणीसाठी यावेळी भारतातील शहरातच लिलाव प्रक्रिया पार पडेल, अशी अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया ही भारताबाहेर पार पडणार आहे. कधी आणि कुठं पार पडणार मिनी लिलाव? जाणून घेऊयात यासंदर्भात नव्याने समोर आलेली सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग तिसऱ्यांदा परदेशात पार पडणाल IPL लिलाव प्रक्रिया
पीटीआयने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या आगामी हंगामासाठी नियोजित मिनी लिलाव प्रक्रिया भारताबाहेरच पार पडणार आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी IPL मधील खेळाडूंवर परदेशात बोली लागल्याचे पाहायला मिळणार आहे. याआधीच्या दोन हंगामासाठी सौदी अरेबियातील जेद्दाह आणि दुबईत लिलाव प्रक्रिया पार पडली होती.
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
तारीख आणि ठिकाण ठरलं, फक्त अधिकृत घोषणा बाकी
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, १५ आणि १६ डिसेंबरला आगामी आयपीएल हंगामासाठी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. लिलावासाठी अबू धाबी हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. बीसीसीआयने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लवकरच याची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.
१५ नोव्हेंबर रिटेन्शनची शेवटची मुदत, त्याआधी ट्रेड विंडो झालीये खुली
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी सर्व १० फ्रँचायझींना १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले आणि कुणाला रिलीज केलं यासंदर्भातील माहिती बीसीसीआयला कळवायची आहे. दरम्यान सध्या ट्रेड विंडोही खुली करण्यात आली असून या माध्यमातून फ्रँचायझी अदलाबदलीच्या खेळातून तगडा डाव खेळताना दिसतील. यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ सर्वात मोठी डील करणार असल्यामुळे चर्चेत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील संजू सॅमसनला घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजासह सॅम करन याला ट्रेड करण्याचे ठरवले आहे. ही डील जवळपास पक्की मानली जात आहे.