IPL 2026 Auction Australian All Rounder Cameron Green Most Expensive Player Was Sold To KKR : आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमीरात (UAE) येथील अबू धाबीच्या एतिहाद अरेना येथे पार पडलेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ग्रीन कॅमरून याच्यावर मोठी बोली लागली. २ कोटी बेस प्राइजसह बॅटरच्या यादीतून लिलावात नाव नोंदणी करणाऱ्या या खेळाडूला संघात घेण्यासाठी फ्रँचायझी संघामध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. पर्समध्ये सर्वात कमी पैसा असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने ग्रीनवर पहिली बोली लावली. पण शेवटी पर्समध्ये सर्वाधिक रक्कम घेऊन लिलावात उतरलेल्या कोलकाता फ्रँचायझी संघाने बाजी मारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला कॅमरून ग्रीन
सर्वात आधी मुंबई इंडियन्सच्या संघाने बोलीची रक्कम वाढत जाईल तशी कोलकाता आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघच शर्यतीत उरल्याचे पाहायला मिळाले. शेवटी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने २५ कोटी २० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्याचा डाव यशस्वी करुन दाखवला. या विक्रमी बोलीसह कॅमरून ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियन मिचेल स्टार्कच्या (२४ कोटी ७५ लाख) नावे होता.
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
कॅमरून ग्रीनवर मोठी बोली लागली अन् BCCI मालामाल झाली! ते कसं?
BCCI नं IPL मधील परदेशी खेळाडूंच्या सॅलरी कॅपसंदर्भात केलेल्या नव्या नियमानुसार, परदेशी खेळाडूंना १८ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार नाही. त्यामुळे मिनी लिलावात कॅमरून ग्रीनवर २५ कोटी २० लाखांची बोली लागली असली तरी त्याला फक्त १८ कोटी रुपये मिळतील. याआधी तो १७.५० कोटींसह दोन हंगाम खेळला होता. १८ कोटींपेक्षा अधिक लागलेली बोली ही BCCI च्या वेलफेअर अकाउंटमध्ये जमा होईल. त्यामुळे परदेशी खेळाडूवर मोठी बोली लागल्यामुळे BCCI मालामाल झाल्याचे चित्र मिनी लिलावात पाहायला मिळाले.
MI कडून IPL पदार्पण; मग RCB च्या ताफ्यातून खेळताना दिसला
कॅमरून ग्रीन याने २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून IPL मध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी MI च्या संघाने या अष्टपैलू खेळाडूसाठी १७.५० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली होती. २०२४ च्या हंगामात ट्रेड विंडोच्या माध्यमातून तो आरसीबीच्या संघाकडून खेळताना दिसला. २०२५ च्या हंगामात ब्रेक घेतल्यावर यंदाच्या हंगामात तो पुन्हा परतला. ऑलराउंडर असताना बॅटरच्या रुपात लिलावात नाव नोंदणी केल्यामुळे २ कोटी या बेस प्राइजसह त्याचे नाव सेट १ मध्ये होते.
कॅमरून ग्रीनची IPL मधील आतापर्यंतची कामगिरी
२०२३ च्या हंगामात कॅमरून ग्रीन याने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून १६ सामने खेळला होता. या हंगामात त्याने १ शतक आणि २ अर्धशतकाच्या जोरावर पदार्पणाच्या हंगामात ५०.२२ च्या सरासरीसह १६०.२८ च्या स्ट्राइक रेटसह ४५२ धावा काढल्या होत्या. २०२४ च्या हंगामात RCB च्या संघाकडून खेळताना त्याला फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली. १३ सामन्यात ३१.८८ च्या सहासरीसह १४३.२५ च्या स्ट्राइक रेटनं त्याने २५५ धावा काढल्या. आतापर्यंत त्याने २९ IPL सामन्यात ७०७ धावा केल्या आहेत. MI कडून पहिल्या हंगामात केलेली नाबाद १०० धावांची खेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.