Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)

लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने नेट प्रॅक्टिसदरम्यानचा अर्जुन तेंडुकरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:32 IST

Open in App

IPL 2026 Arjun Tendulkar Yorker Video :  क्रिकेटचा देव आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सकडून मिळणाऱ्या अल्प संधीनंतर IPL मध्ये आपली छाप सोडण्यासाठी नव्या संघाची वाट धरली आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून यंदाच्या हंगामात तो रिषभ पंतच्या लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाचा भाग आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ सोडून गोव्याच्या संघाकडून खेळताना त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतील धमक दाखवून दिली होती. IPL मध्येही तो असाच डाव साधणार का? याची चर्चा रंगत असली तरी पहिल्या दोन सामन्यात LSG च्या संघाने त्याला बाकावरच बसवले. पण आता त्याच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची हिंट मिळत आहे. लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने नेट प्रॅक्टिसदरम्यानचा अर्जुन तेंडुकरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो बुमराहच्या धाटणीत सलग यॉर्करचा मारा करत कर्णधार रिषभ पंतला प्रभावित करताना दिसत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अर्जुन तेंडुलकरनं यॉर्करसह पंतला केलं प्रभावित 

  लखनौच्या संघ ९ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधी अर्जुन तेंडुलकरने नेट प्रॅक्टिसमध्ये आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतकासह संघाला पहिला विजय मिळवून देणारा रिषभ पंत युवा गोलंदाजासमोर संघर्ष करताना दिसला. LSG फ्रँचायझी संघाने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात अर्जुन तेंडुलकरची सातत्यपूर्ण अचूक टप्प्यावर यॉर्कर मारण्याची खास क्षमता दिसून येते. तो LSG चा बुमराह होऊन यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने दाखवून दिले.

David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?  LSG कडून पदार्पणाची संधी मिळणार का?

२६ वर्षीय अर्जुन तेंडुलकरने नेट्स प्रॅक्टिसमध्ये दाखवलेली गोलंदाजीची धार ही तो पुन्हा एकदा IPL चं मैदान गाजवण्यासाठी तयार असल्याचे चित्र निर्माण करणारी आहे. LSG नं त्याचा खास व्हिडिओ शेअर करून त्याच्या पदार्पणाची हिंटच दिलीये का? असा प्रश्नही काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगणाऱ्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

 अर्जुन तेंडुलकरची IPL कारकिर्द

 अर्जुन तेंडुलकर हा गोलंदाजीसह फंलदाजीत उपयुक्त कामगिरी करु शकणारा खेळाडू आहे. अनेक वर्षे मुंबई इंडियन्ससोबत राहिल्यावरही त्याला या संघाकडून फक्त ५ सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याच्या नावे ३ विकेट्स जमा आहेत. २०२६ च्या IPL स्पर्धेसाठीच्या झालेल्या मिनी लिलावाआधी ट्रेडच्या माध्यमातून तो ३० लाख रुपयांसह लखनौचा झाला. नव्या संघाकडून पदार्पणासाठी तो उत्सुक आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Arjun Tendulkar's Yorker Show! Hints at Debut with LSG.

Web Summary : Arjun Tendulkar impresses with yorkers in LSG practice, potentially debuting soon. He honed skills in domestic cricket after limited opportunities with Mumbai Indians. A video shows him troubling captain Rishabh Pant, hinting at his readiness for the Kolkata Knight Riders match.
टॅग्स :आयपीएल २०२६अर्जुन तेंडुलकरलखनौ सुपर जायंट्सरिषभ पंत