IPL 2026 Orange Cap Race : आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील दिवसागणित रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आलेला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील सामनाही शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. या सामन्यात कोलकाताच्या संघाला अखेरच्या षटकात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि रघुवंशीचा जलवा पाहायला मिळाला. दोघांचेही अर्धशतक हुकले. पण अंगकृष रघुवंशीनं चौथ्या सामन्यातील ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अनुभवी अजिंक्य रहाणेही या शर्यतीत अव्वल पाचमध्ये असल्याचे दिसते. आतापर्यंत फलंदाजीत छाप सोडणाऱ्या फलंदाजांच्या कामगिरीवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी जैस्वाला टक्कर देतोय हा अनकॅप्ड खेळाडू
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ३ सामन्यानंतर १७० धावांसह ऑरेंज कॅपसह मिरवताना दिसत आहे. त्याच्या भात्यातून दोन अर्धशतके पाहायला मिळाली असून ७७ ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सच्या समीर रिझवीचा नंबर लागतो. त्यानेही ३ सामन्यात २ अर्धशतकाच्या मदतीने १६० धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. या दोघांमध्ये सध्याच्या घडीला तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे.
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
टॉप ५ मध्ये फक्त एक परदेशी खेळाडू
कोलकता नाईट रायडर्सचा संघ सातत्याने पराभवाचा सामना करत असला तरी या संघाकडून युवा बॅटर अंगकृष रघुवंशी कमालीची कामगिरी करताना दिसतोय. ४ सामन्यातील ४ डावात २ अर्धशतकांसह त्याने १५५ धावा केल्या आहेत. ५२ ही त्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वो्च धावसंख्या आहे. त्याच्यापाठोपाठ सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक बॅटर हेन्री क्लासने ३ सामन्यातील ३ डावात दोन अर्धशकासह १४५ धावा खात्यात जमा करत चौथ्या स्थानावर असून कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे ४ सामन्यातील १ अर्धशतकाच्या जोरावर १२४ धावांसह टॉप ५ मध्ये दिसतोय. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय सलामीवीर ३ सान्यातील १२२ धावांसह सहाव्या तर मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा ११८ धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीनं २ सामन्यात एका अर्धशतकासह ९७ धावा केल्या असून तो टॉप १० मधूनही बाहेर आहे. तिसऱ्या सामन्यात तो मोठ्या खेळीसह या शर्यतीत आगेकूच करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Yashasvi Jaiswal tops the IPL 2026 Orange Cap race with 170 runs. Raghuvanshi shines, while Kohli and Rohit trail. Rizvi provides stiff competition. The race intensifies with emerging talents showcasing their skills.
Web Summary : यशस्वी जायसवाल 170 रनों के साथ आईपीएल 2026 ऑरेंज कैप रेस में सबसे आगे हैं। रघुवंशी चमके, जबकि कोहली और रोहित पीछे रहे। रिज़वी कड़ी प्रतिस्पर्धा दे रहे हैं। उभरती प्रतिभाओं के साथ दौड़ तेज हो गई है।