आयपीएलच्या आगामी हंगामाआधी ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन चांगलाच चर्चेत आहे. मिनी लिलावात या खेळाडूंवर पैशांची बरसात झाल्याचे पाहायला मिळू शकते. BCCI नं IPL मधील परदेशी खेळाडूंसाठी तयार केलेल्या नव्या नियमानुसार, त्याला १८ कोटींपेक्षा अधिक पॅकेज मिळणार नाही. पण ही रक्कम मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्याने कमालीची चाल खेळली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर खेळाडूने बॅटरच्या यादीतून केली नाव नोंदणी
कॅमरुन ग्रीन हा ऑलराउंडर क्रिकेटपटू आहे. फलंदाजीसह गोलंदाजीच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू मिनी लिलावात फलंदाजांच्या गटात दिसतो. ऑलराउंडर असूनही त्याने फलंदाजांच्या गटातून नाव नोंदणी का केली? गत हंगामात मिचेल मार्शप्रमाणे आगामी हंगामात कॅमरून ग्रीन फक्त बॅटरच्या रुपात खेळणार का? असा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. पण तसे नाही. यामागच कारण हा अधिक पैसा कमावणे हाच आहे. ते कसं जाणून घेऊयात सविस्तर
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
'छप्पर फाड' कमाईसाठी परदेशी खेळाडूने खेळला हा डाव
आयपीएलच्या लिलावात सर्वात आधी पहिल्या सेटमध्ये फलंदाजांवर बोली लागते. मिनी लिलावात फ्रँचायझी संघाकडे कमी पैसा असतो. यंदाच्या हंगामात पहिल्या सेटमध्ये ६ फलंदाज आहेत. ५ फ्रँचायझी संघांच्या पर्समध्ये २० कोटींहून अधिक रक्कम आहे. पहिल्या सेटमध्ये सर्वाधिक मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. फ्रँचायझींनी पहिल्या सेटमध्ये अधिक पैसा खर्च केला तर ऑलराउंडरवर बोली लागवताना मोठी बोली लागण्याची शक्यता धूसर होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन कॅमरून ग्रीन याने बॅटरच्या यादीतून नाव नोंदणी केल्याचे दिसते. मिनी लिलावात त्याची ही चाल यशस्वी ठरणार का? तो यंदाच्या लिलावातील महागडा खेळाडू ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
IPL मध्ये तगडी कमाई करणारा खेळाडूंपैकी एक आहे ग्रीन
कॅमरून ग्रीन हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्यासाठी १७ कोटी ५० लाख एवढी मोठी रक्कम मोजली होती. २०२४ च्या हंगामात तो ट्रेड विंडोच्या माध्यमातून याच प्राइज टॅगसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात गेला होता.