IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!

Virat Kohli Trolled: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने संथ गतीने फलंदाजी केल्याने त्याला ट्रोल केले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 22:15 IST2025-06-03T22:15:14+5:302025-06-03T22:15:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2025Fans Troll Virat Kohli Underwhelming Final Knock agaist Punjab Kings | IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!

IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!

आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्जसमोर निर्धारित २० षटकांत ९ विकेट्स गमावून १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु, तो ३५ चेंडूत ४३ धावा करून पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्याला चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली

आरसीबीच्या डावातील पंधराव्या षटकात पंजाबच्या अझमतुल्लाहने विराट कोहलीला झेल बाद केले. यानंतर संपूर्ण मैदानात शांतता पसरली. विराट कोहली आरसीबीचा आघाडीचा फलंदाज आहे. या संपूर्ण हंगामात त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, तो अपयशी ठरला. 

पंजाबसमोर १९१ धावांचे लक्ष्य
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली आणि पंजाब किंग्जला १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने भेदक गोलंदाजी करून ३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. 

पंजाबविरुद्ध आरसीबीचा संघ:
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड

आरसीबीविरुद्ध पंजाबचा संघ:
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Web Title: IPL 2025Fans Troll Virat Kohli Underwhelming Final Knock agaist Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.