Join us

CSK vs DC : धोनीचा शेवटचा सामना? जाणून घ्या सोशल मीडियावर का रंगलीये ही चर्चा

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्या दरम्यान एक फोटो व्हायरल झाला अन् त्यावरून चर्चेला आलं उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:31 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानावर रंगल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्जचा सामना असला की, महेंद्रसिंह धोनी चर्चेचा केंद्रबिंदू असतो. तो बॅटिंगला येणार का? आला तर तो कितव्या क्रमांकावर खेळेल? या गोष्टीमुळे तो मागील काही सामन्यात चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. पण आता दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर धोनी निवृत्त होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्या दरम्यान एक फोटो व्हायरल झाला अन् त्यावरून   दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध धोनी आयपीएलमध्ये  शेवटचा सामना खेळण्यासाठी उतरलाय का? अशी चर्चा रंगू लागली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

धोनीच्या आई वडिलांची झलक दिसली, अन् सोशल मीडियावर चर्चेला उधाण 

चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि लेक झीवा क्रिकेटरला चीअर करण्यासाठी अनेकदा स्टेडियमवर हजेरी लावल्याचे पाहायला मिळते. पण ५ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात धोनीचे आई वडील सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्हीआयपी स्टेडियम स्टँडमध्ये उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून धोनी चेपॉकच्या मैदानात मोठा निर्णय घेऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

IPL 2025 : पियानोवादक ते यॉर्कर किंग! पोराला घडवणाऱ्या MS धोनीला क्रिकेटरची फॅमिली मानते देव

महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत खेळताना दिसतोय. वयाच्या ४३ व्या वर्षीही विकेटमागची  त्याची चपळता कमालीची आहे. पण फलंदाजीच्या मुद्यावरून धोनी चर्चेत आला होता.  धोनी वरच्या  क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही? हा प्रश्न चांगलाच गाजला. यावर चेन्नईच्या प्रशिक्षकाने स्पष्टीकरणही दिल्याचे पाहायला मिळाले होते.  गुडघ्याच्या दुखापतीनंतर तो मैदानात उतरत असला तरी या दुखापतीतून तो शंभर टक्के बरा झालेला नाही. शरीरही त्याला पहिल्यासारखे साथ देत नाही. त्यामुळे १० पेक्षा अधिक षटके खेळणं त्याच्यासाठी मुश्किल आहे. या परिस्थितीतही तो संघासाठी शक्य होईल तेवढे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे, असे मोठं वक्तव्य चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी केले होते. त्यानंतर आता धोनीचे वडील आणि आई सामन्यासाठी चेपॉकच्या मैदानात दिसल्यावर सोशल मीडियावर  दिल्ली विरुद्धच्या सामन्यानंतर धोनी आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकतो, असा अंदाज बांधण्यात येत आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्समहेंद्रसिंग धोनी