IPL 2025 : आयपीएल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षातील आयपीएलचे सामने लवकरच सुरू होणार आहेत. आयपीएल बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी एक मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी या वर्षात होणाऱ्या आयपीएलची तारीख जाहीर केली आहे. २३ मार्च पासून आयपीएलचे सामने सुरू होणार असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.
आयपीएल २०२५ चा हंगाम २३ मार्चपासून सुरू होईल. हंगामातील पहिला सामना कोणते संघ खेळतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. माध्यमांशी बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, बैठकीत फक्त एकच प्रमुख मुद्दा होता आणि तो म्हणजे कोषाध्यक्ष आणि सचिवांची निवड. आयपीएल कमिशनरची नियुक्ती देखील एका वर्षासाठी करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ २३ मार्चपासून सुरू होईल. महिला प्रीमियर लीगची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत, ती लवकरच जाहीर केली जातील.
मागील आयपीएलचा हंगाम २२ मार्च रोजी सुरू झाला होता, त्यावेळी हंगामाचा पहिला सामना आरसीबी आणि सीएसके यांच्यात खेळला होता. तर, २६ मे रोजी केकेआर आणि हैदराबाद संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. त्यानंतर केकेआर संघाने अंतिम सामना जिंकला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन बनला. यावेळी अंतिम सामना केकेआरच्या होम ग्राउंड ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो.