भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. विराटचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला. आयपीएल २०२५ स्पर्धेतील उर्वरित सामने आजपासून खेळवले जाणार आहे आणि पहिलाच सामन्यात आरसीबी आणि कोलकाता एकमेकांशी भिडणार आहेत. त्याआधी विराट कोहलीच्या चाहत्यांनी बंगळुरू स्टेडियमबाहेर त्याच्या नावाची भारतीय कसोटी संघाची जर्सी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीचा हा पहिलाचा आयपीएल सामना आहे. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विराट कोहलीची कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याने त्याच्या चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटुंना धक्का बसला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
भारताचा यशस्वी कसोटी कर्णधारदरम्यान, विराट कोहली यशस्वी भारतीय कसोटी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ६८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ४० सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय, विराटने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामन्यांत ९ हजार २३० धावा केल्या. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज आहे.
आरसीबी- कोलकाता यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावटआरसीबी आणि कोलकात यांच्यात आज संध्याकाळी खेळल्या जाणार असलेल्या सामन्यात पाऊस विघ्न आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक उशिरा होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगळुरूमध्ये आज संध्याकाळी १०० टक्के ढगाळ वातावरण आणि ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.