Join us

कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

हा सामना विराट कोहलीसाठी एकदम खास करण्याचा प्लॅन त्याच्या चाहत्यांनी आखलाय. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:24 IST

Open in App

Virat Kohli RCB Vs KKR :  भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा सुरु होतीये. यंदाच्या हंगामाची सलामीची लढत ज्या दोन संघांमध्ये रंगली होती त्या दोन संघातील लढतीनेच दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शनिवारी १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना बंगळुरुच्या मैदानात रंगणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी एकदम खास करण्याचा प्लॅन त्याच्या चाहत्यांनी आखलाय. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

BCCI कडून फेअरवेल मॅच नाही मिळाली, नो प्रॉब्लेम... चाहत्यांनी आखला प्लॅन

विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटनंतर आता कसोटीतूनही निवृत्ती घेतली आहे. किंग कोहलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत १४ वर्षांच्या प्रवासानंतर रेड बॉल क्रिकेटमधील प्रवास थांबवत असल्याची माहिती दिली. मॉडर्न क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करत अधिराज्य गाजवणाऱ्या कोहलीला फेअरवेल मॅच मिळणार नाही, ही खंत त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. ही कमी भरून काढण्यासाठी विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खास कामगिरीसह छाप सोडणाऱ्या कोहलीसाठी बंगळुरुच्या मैदानात खास मोहाल तयार करून त्याला सलाम करण्यात येणार आहे.     

टीम इंडियाची 'क्वीन' स्मृती मानधना नंबर वन 'ताज'सह मिरवण्याच्या तयारीत; इथं पाहा तिची कामगिरी

कोहलीसाठी सोशल मीडियावर सुरु झाली खास मोहिम

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील लढतीला सुरुवात होण्याआधी विराट कोहली अन् आरसीबी चाहत्यांनी सोशल मीडियावर एक खास मोहिम राबवलीये. बंगळुरुच्या मैदानात सामन्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चाहत्याने पांढऱ्या रंगातील कपडे घालून स्टेडिमवर  यावे, अशी विनंती करण्यात येत आहे. याचा अर्थ कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या बहुमूल्य योगदानासाठी चाहते व्हाइट आउटफिट्समध्ये किंग कोहलीला खास अंदाजात सलाम करताना दिसतील. आरसीबीच्या मॅचवेळी बंगळुरुच्या मैदानात लाल रंगाची हवा दिसते. पण यावेळी कोहलीसाठी कायपण...म्हणत चाहत्यांमध्ये पांढऱ्या रंगाची लाट उसळणार आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमिअर लीग