पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात काल (२० एप्रिल) आयपीएल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने दमदार कामगिरी करत पंजाबचा पराभव केला. बंगेलोरचा माजी कर्णधार विराट कोहली संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. नुकताच पंजाब किंग्जने आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खानला विराट कोहलीने बॅट गिफ्ट केल्याची पाहायला मिळत आहे. मुशीरने व्हिडिओमध्ये विराटसोबतच्या भेटीबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत.
पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर कोहलीने मुशीर खानला त्याची बॅट भेट दिली. व्हिडिओत मुशीर खान या खास क्षणाबद्दल सांगत आहे. मुशीर ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच त्याला विचारण्यात आले की, ही बॅट कोणाची आहे? यावर मुशीर हसला आणि त्याने विराट कोहलीचे नाव घेतले.
मुशीने विराटकडून बॅट कशी मागितली?मुशीर म्हणाला की, मी विराट भैय्याला म्हणालो की, मला त्यांची बॅट हवी आहे. मी तुमच्या बॅटने याआधी खूप धावा केल्या आहेत. सरफराज भैय्या नेहमी तुमच्याकडून माझ्यासाठी बॅट आणायचा. म्हणूनच यावेळी मी स्वत: बॅट मागायचे ठरवले. मी विराट भैय्याला म्हणालो की, तुमच्या चांगली किंवा तुटलेली बॅट असेल तर ती मला द्या आणि त्यांनी मला बॅट दिली.
मुशीर खानचा आनंद गगनात मावेनाविराट कोहलीकडून बॅट भेट मिळाल्यानंतर मुशीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. विराट कोहली हा जगातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे आणि मुशीर त्याला लहानपणापासून क्रिकेट खेळताना पाहत आहे. हा मुशीरच्या कारकिर्दीतील एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरला.
पंजाबविरुद्ध विराटची दमदार खेळीया सामन्यात विराटने शानदार फलंदाजी केली. त्याने ५४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावांची नाबाद खेळी केली. विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे आरसीबीने ७ चेंडू शिल्लक असताना ७ विकेट्सने सामना जिंकला.