Join us

अजिंक्य रहाणे शर्यतीत; पण शाहरूख खान महागड्या गड्यावर खेळणार डाव? कोण होणार KKR चा कॅप्टन?

जाणून घेऊयात कुणाच्या गळ्यात पडू शकते KKR संघाच्या कॅप्टन्सीची माळ यासंदर्भातील खास माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:53 IST

Open in App

IPL 2025 KKR Captain : आयपीएल २०२५ च्या हंगामाची तारीख ठरली आहे. शाहरुख खानच्या मालकीचा अन् गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं २२ मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. पण अद्याप दोन संघ असे आहेत ज्यांचा कॅप्टन कोण ते गुलदस्त्याच आहे. यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघासह यंदाच्या हंगामात सलामीचा सामना खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे. आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार कोण होणार यासंदर्भात एक माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात कुणाच्या गळ्यात पडू शकते कॅप्टन्सीची माळ यासंदर्भातील खास माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अजिंक्य रहाणे शर्यतीत, पण...

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन कोण? या मुद्यावर चर्चा रंगते त्यावेळी भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेचे नावही चर्चेत आले आहे. मेगा लिलावात अखेरच्या टप्प्यात कोलकात नाईट रायडर्सच्या संघानं अजिंक्य राहणेवर डाव खेळला होता. यंदाच्या हंगामात कोलकाताचा संघ या अनुभवी चेहऱ्यावर कॅप्टन्सीचा डाव खेळू शकते, असे बोलले जात होते. पण आता ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, हे नाव मागे पडले असून व्यंकटेश अय्यरनं आपली दावेदारी अधिक भक्कम केलीये. अय्यरच्या जागी अय्यर हा पॅटर्न केकेआर आजमावेल, अशी माहिती समोर येत आहे. 

केकेआरनं त्याच्यासाठी मोजलीये सर्वाधिक रक्कम

​आयपीएल २०२४ च्या हंगामात श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्सची कॅप्टन्सी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं जेतेपदही पटकावले. पण तो आता पंजाबच्या ताफ्याचा कॅप्टन झालाय. त्याच्या जागी शाहरुखच्या मालकीचा संघ सर्वाधिक पैसा खर्च केलेल्या व्यंकटेश अय्यरवरच कॅप्टन्सीचा डाव खेळेल, अशी माहिती समोर येत आहे. फायनली काय होणार ते लवकरच समोर येईल. व्यंकटेश अय्यरसाठी केकेआरनं २३.७५  कोटी एवढी मोठी रक्कम खर्च केली होती. त्यामुळे तोच कॅप्टन्सीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रिमियर लीग २०२५शाहरुख खानवेंकटेश अय्यरअजिंक्य रहाणे