पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये आज आयपीएलचा सामना रंगणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबचा आघाडीचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाली असून तो अश्चित काळासाठी संघाबाहेर झाला आहे. पंजाबच्या संघाने त्याच्याजागी अद्याप कोणत्याही बदली खेळाडूंची घोषणा केली नाही. पंरतु, पंजाबच्या संघात असे ३ गोलंदाज आहेत, जे लॉकी फर्ग्युसनची जागी खेळू शकतात.
शनिवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा परतलाच नाही. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याची चिन्ह आहेत. केकेआर विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी पंजाब किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी फर्ग्युसन अनिश्चित काळासाठी स्पर्धेतून बाहेर पडल्याची पुष्टी केली.
१) रिचर्ड ग्लीसनया शर्यतीत रिचर्ड ग्लीसनचे नाव आघाडीवर आहे. रिचर्ड हा वेगवान गोलंदाज असून कठीण परिस्थितीतही गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याची फर्ग्युसनच्या जागी निवड होऊ शकते. रिचर्डने दक्षिण आफ्रिकेच्या लीगमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत त्याने १३ डावांमध्ये २४.४२ च्या सरासरीने ८.०७ च्या इकॉनॉमीसह १४ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने ११५ सामन्यांत ८.०२ च्या इकॉनॉमी आणि १७.७ च्या सरासरीने १२९ विकेट्स घेतल्या आहेत.
२) लान्स मॉरिसफर्ग्युसनची जागा घेणारा लान्स मॉरिस हा त्याच्या भूमिकेशी जुळणारा आणखी एक खेळाडू आहे. तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. मॉरिसने २२.९५ च्या सरासरीने ४० विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये ३५ टी-२० डावांमध्ये पाच विकेट्स घेण्याचा समावेश आहे. मॉरिसने अद्याप टी२० मध्ये पदार्पण केलेले नाही, परंतु तो अजूनही संघासाठी एक चांगली निवड ठरू शकतो.
३) जेसन बेहरेनडॉर्फऑस्ट्रेलियाचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज जगभरातील विविध टी-२० लीगचा भाग राहिला आहे. त्याने आतापर्यंत १६८ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ७.६० च्या इकॉनॉमी आणि १७.६ च्या स्ट्राईक रेटसह २०३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने १७ सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत.