Join us

Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक'

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीसह गाठला विकेट्सच्या शंभरीचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 21:58 IST

Open in App

Shardul Thakur 100 IPL Wickets : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेल्या शार्दुल ठाकूरनं आयपीएलमध्ये १०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत खास शतकी डाव साधला. पहिल्या स्पेलमध्ये एका षटकात दोन विकेट घेणाऱ्या शार्दुलनं आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये २ विकेट्स घेत या सामन्यात चार विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. यासह त्याने ९७ सामन्यात १०० विकेट्सचा पल्ला गाठला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पर्पल कॅपवरही केला कब्जा 

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं २ विकेट्स घेत दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या सामन्यातील ४ विकेट्स घेत त्याने यंदाच्या हंगामात आपल्या खात्यात ६ विकेट जमा केल्या आहेत. दुसऱ्याच सामन्यात त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. 

Unluckiest Run Out Ever: नितीश कुमार रेड्डीचा कॅच सुटला, पण नॉन स्ट्राइकवर क्लासेन फसला!

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी

सनरायझर्स हैदराबाद  विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं ४ षटकात ३४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. लखनऊच्या ताफ्यातून खेळताना ४ विकेट्स घेणारा तो सातवा गोलंदाज ठरला.  आयपीएलच्या आतापर्यंतच्या  इतिहासातील ही त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली. याआधी २०२२ च्या ंहगामात त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध  ४ षटकात ३६ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या होत्या. 

IPL लिलावात अनसोल्ड राहिल्यावर बदली खेळाडूच्या रुपात मिळाली संधी 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही आयपीएलच्या मेगा लिलावा कुणीही त्याच्यावर बोली लावली नव्हती. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातील युवा गोलंदाज मोहसीन खान दुखापतग्रस्त झाला अन् शार्दुल ठाकुरला बदली खेळाडूच्या रुपात LSG च्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पहिल्या सामन्यापासून तो  आपल्यातील धमक दाखवून देत आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्सशार्दुल ठाकूर